'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

ग्रामीण आरोग्याचा ‘कानोसा’

           प्रा. आ. केंद्र, जिमलगट्टा येथे कामाला सुरवात केली तेव्हा focus असा कुठल्याच गोष्टीवर नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नांच्या अभ्यासाचेही तेच! त्याला विशेष अशी दिशा नव्हती. याच दरम्यान अम्मांचे ‘कानोसा’ हे पुस्तक वाचायला सुरवात केली. ग्रामीण आदिवासी स्त्रियांचे स्वतःचे शरीर आणि आरोग्यासंबंधी विविध समज आणि गैरसमज मला या पुस्तकातून माहिती झाले. एखादा आजार कसा होतो, मग आहारातल्या कुठल्या घटकाचा त्यावर कसा परिणाम होतो, काय खावं आणि काय नको याबद्दलच्या (त्यांच्या) समजुती वाचून सुरवातीला खरं म्हणजे गंमतच वाटली. या सर्व गोष्टी अम्मांनी या भागात काम करणाऱ्या सुईणींकडून समजावून घेतल्या हे विशेष आवडलं. कारण गडचिरोलीसारख्या भागात जिथे आरोग्यासंबंधी आधुनिक सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत तिथे दाई, सुईणी या पारंपारिक आरोग्यसेवकांचा लोकांच्या मनावर खूप मोठा प्रभाव असतो. दाईच्या समजुती आणि गैरसमजुती त्या भागातील लोकांच्या आरोग्यविषयक कल्पना आणि चालीरीतींमधून थेट प्रतिबिंबित होतात.
  ‘कानोसा’मध्ये अम्मांनी येथील स्त्रियांना भेडसवणाऱ्या प्रमुख समस्यांचा वेध घेतला आहे. त्यातून या समस्यांकडेही माझे लक्ष वेधले गेले. हा संपूर्ण आवाकाच माझ्याकडून दुर्लक्षित राहात होता. उदाहरणार्थ मासिक पाळीची अनियमितता, गुप्त रोग, इत्यादी आजारांबद्दल आजपर्यंत कोणीही माझ्याशी उघडपणे बोलले नव्हते. फक्त ‘कमजोरी वाटते आहे’ यापेक्षा वेगळी काही तक्रार नसायची. यानंतर मीच जेव्हा थेट (उघड) प्रश्न विचारण्यास सुरवात केली तेव्हा मग पदर जाणे, पाळीच्या दरम्यान त्रास होणे, अशा विविध गोष्टी समोर यायला लागल्या.
  अम्मांच्या पुस्तकातून, त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीतून झालेल्या शिक्षणाची मला माझं रोजच काम अधिक लोकाभिमुख करायला खूप मदत झाली. मी काम करत असलेल्या गावातील लोकांना अधिक समजावून घेताना, त्यांच्यासाठी उपयोगी पडताना होणारा आनंदही विरळाच!


अमित ढगे, (निर्माण ६)

No comments:

Post a Comment