'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

निर्माणीच्या नजरेतूनThe Federation of All India Farmer Associations [FAIFA] ह्या तंबाखू – पाल्म उत्पादक “शेतकऱ्यांच्या भल्यासाठी” २०१५ मध्ये स्थापलेल्या संस्थेने केलेली ही जाहिरात.


जाहिरातीची जागा केंदीय मंत्रालयाच्या आवारात, उद्योग भवनासमोरच्या चौकात लावलेला हा फ्लेक्स
वेळ - नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत संसदेचं हिवाळी सत्र  + WHO FCTC (Framework Convention on Tobacco Control) Conference of the Parties (COP7) होणार होती.

ही जाहिरात पाहून २ मुद्दे ठळक होतात.
.       एका शेतकऱ्याच्या उदास – भकाल चित्राद्वारे केलेले आवाहन हे खुप aggressive professional marketing चे उत्कृष्ट उदाहरण आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना २ ठिकाणी आपले व्यक्त होणे गरजेचे आहे. Policy maker’s समोर लोकांचे हित कशात आहे ते मांडणे आणि एकूण समाजात प्रबोधनाचे / health awareness / education ई. बाबत चे संदेश पोहचवणे. ह्या दोन्ही ठिकाणी वरील जाहिरातीच्या तुलनेत सध्याचे प्रयत्न मवाळ वाटतात. गांधीनी सांगितलेल्या शेवटच्या माणसाचे भले करायचे असेल तर सामाजिक काम करणाऱ्या सगळ्यांना अजून प्रभावी प्रचाराच्या पद्धती शोधाव्या / वापराव्या लागतील. ह्या जाहिरातीतून हे शिकण्यासारखं आहे.

. भारतात २००० लक्ष लोक तंबाखू वापरतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि आर्थिक जीवनमान धोक्यात येते. ह्यातील बहुतांशी लोक ग्रामीण गरीब मजूर / शेतकरी आहेत.  ह्या लोकांचं भलं चिंतावं की मोजक्या कंपन्या / तंबाखू उत्पादक + पाल्म तेल उत्पादक शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याचे निर्णय घ्यावे हा सरकारी धोरण ठरवणाऱ्या चा choice आहे. त्यातूनच सरकार कुणासाठी कल्याणकारी आहे ते ठरेल.

उमेश जाधव, (निर्माण ५)


No comments:

Post a Comment