'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

निर्माण ७ बॅचच्या शिबिरांना सुरवात

निर्माणच्या सातव्या बॅचचे पहिले शिबीर (७.१ अ) शोधग्राम मध्ये २८ डिसेंबर ते ५ जानेवारी या काळात संपन्न झाले. यामध्ये इंजिनिअरिंग, विज्ञान, पत्रकारिता, कला, सोशल वर्क, कॉमर्स, मास मिडिया, फार्मसी, शेतकी, मॅनेजमेंट अशा विविध शाखांचे ५४ विद्यार्थी सहभागी झाले होते. दरवेळीप्रमाणे, ‘तरुण्याभान ते समाजभान’ अशी या शिबिराची थीम होती.शिबिरात अम्मांनी वयात येणे आणि प्रजनन इंद्रिये, अमोल आणि आरतीने REBT व स्वचा स्वीकार, सुनील काकांनी सामाजिक विषमता आणि प्रफुल्लने Happiness Vs Meaning इ. विषय सेशन्सच्या माध्यमातून समजावून सांगितले. तसेच सामाजिक काम करण्यासाठीच्या माझ्या प्रेरणा काय व माझी आर्थिक गरज किती याबाबत स्पष्टता यावी यासाठी अमृत व केदार यांनी छोटे छोटे exercise घेतले. माया स्टोरी, जितो जितना जीत सको, गावभेट व सादरीकरण (८ गटांनी गावातील विविध प्रश्नांविषयीची निरीक्षणे आणि कृती कार्यक्रम सादर केले), बुक क्लब (शिबिरातील १२ जणांनी १२ पुस्तकांची समीक्षा सादर केली) असे वेगवेगळ्या माध्यमातून शिबीर पार पडत गेले. प्रतिक वडमारे (निर्माण ६) व ऋतगंधा देशमुख (निर्माण ४) या निर्माणींनी आपला प्रवास शेअरिंगच्या माध्यमातून शिबिरार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. यासोबतच नायनांसोबतच्या प्रश्नोत्तरीमुळे शिबीर अधिकच समृद्ध होत गेले.
अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असलेल्या नव्या सहप्रवासींचे निर्माण परिवारात स्नेहपूर्वक स्वागत !


No comments:

Post a Comment