'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

मुक्तीपथ: दारू व तंबाखू विरुद्ध गडचिरोली जिल्हा

निर्माण ६ चा प्रतिक वडमारे गडचिरोली जिल्ह्यात सुरु झालेल्या मुक्तीपथ अभियानात रुजू झाला आहे. त्याच्या या निर्णयाविषयी व मुक्तीपथ अभियानाविषयी त्याच्याच शब्दात...

           सर्च मध्ये कामाला सुरुवात करताना ठरवलेला एक वर्षाचा कालावधी संपून गेला होता. पुढे काय करायचं हा प्रश्नच होता. सर्च मध्ये वर्षभर केलेल्या कामातून मुख्यतः कुठल्याही प्रकल्पाच्या अंमलबजावणीत लहान लहान गोष्टी किती महत्वाच्या असतात व त्यांची अंमलबजावणी कशी करायची हे प्रामुख्याने शिकलो होतो.
   गडचिरोलीत सुरु झालेल्या मुक्तीपथ प्रकल्पात, प्रकल्पातील नियोजित गोष्टींची अंमलबजावणी किती परिणामकारकरित्या होते आहे हे समजण्यासाठी त्यासंबंधीत माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषन करणार्‍या व्यक्तीची गरज होती. पुर्वी केलेल्या कामातुन झालेल्या शिक्षणास अनुरुप कामाची संधी व सर्चच्या सुरक्षित वातावरणातुन बाहेर पडुन कामाला भिडता येईल तसेच, गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष फिरुन समाजाचे वास्तव स्वरुप पाहता येईल या विचारांनी मी मुक्तिपथ कार्यक्रमात १ ऑक्टोबर २०१६ रोजी रुजू झालो.       मुक्तिपथ हा सर्च, टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यात सुरु झालेला एक अभिनव प्रकल्प आहे. दारु व तंबाखूची भीषण समस्या असलेल्या या जिल्ह्यातील लोकांचा दारु व तंबाखूवर होणारा खर्च, येत्या ३ वर्षांत किमान ३० टक्क्यांनी कमी होऊन दरवर्षी १०० कोटी रुपयांची जनतेच्या पैशांची बचत करणे हे या प्रकल्पाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासापेक्षा व्यसनावर जास्त खर्च करणार्‍या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा नक्कीच एक पथदर्शी उपक्रम ठरेल असे वाटते.

प्रतीक वडमारे, (निर्माण ६)


No comments:

Post a comment