'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

सोनालीचे ‘उर्मी’ सोबत काम सुरु

मुळची पुण्याची असलेली सोनाली मेढेकर (निर्माण ७) सध्या मुंबई येथे कौन्सेलिंग सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने मुंबईच्या वस्तीतल्या मतीमंद मुलांसोबत काम करणाऱ्या उर्मी या संस्थेसोबत काम सुरु केले आहे. तिच्या या निर्णयाबद्दल तिच्याच शब्दात...

ऊर्मी संस्था मागील ५ वर्षापासून मुंबईमधील वस्तीतल्या मतीमंद मुलांबरोबर काम करत आहे. संस्थेकडे महानगरपालिकेच्या ६ शाळांमध्ये शिकवण्याची जबाबदारी असून त्यांच्या स्वतःच्या वस्ती पातळीवरती ४ शाळा आहेत. संस्थेचे काम पूर्णतः research based व mental health professionals बरोबर चालते. ऊर्मीची पूर्ण टीम वेळोवेळी वस्तीत जाऊन, मतीमंद मुलांचा मागोवा घेते; त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून मुलांना शाळेत आणण्याचे काम करते, जेणेकरून या मुलांना मुख्य प्रवाहात यायला मदत होईल. गरज लागल्यास काही मुलांसाठी घरापर्यंत जाऊन therapy व शिक्षण देते.
मागील वर्षापासून ऊर्मी बरोबर काही काम चालू होते, तेव्हा मी या मुलांच्या घरी जाऊन पालकांशी बोलायचे, मुलांची काही therapy घ्यायचे. तेव्हा लक्षात आले की यांच्यासाठी ऊर्मी व महानगरपालिका यांच्या सोयी उपलब्ध आहेत पण त्या बद्दलची माहिती यांना नाही, अथवा इतर काही अडचणी असल्यामुळे त्यांना मुलांना तिथपर्यंत पोचवणे कठीण जात आहे. जेव्हा कळले की शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज आहे, तेव्हा मला ऊर्मी व पालकांचे सर्व कष्ट आणि मेहनत समोर उभी राहिली व वाटले की शाळेत आणण्यापर्यंत घेतलेली ही मेहनत पुरेपूर उपयोगी आली पाहिजे व मुलांचा शाळेतला वेळ जास्तीत जास्त कारणी लागला पाहिजे. शेवटी एका मुलाला शाळेत आणण्यासाठी त्या घरातल्या हातावर पोट असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा वेळ त्यावर invest झालेला असतो व इतर अनेक लोकांनी त्यावर मेहनत घेतलेली असते. मला मुलांबरोबर राहायला व शिकवायला मनापासून आवडते तसेच मला वाटले की special मुले, त्यांचे पालक, शाळा, शिक्षक आणि त्यांना शिकवण्याच्या पद्धती मी जवळून पाहू शकेन, अधिक शिकू शकेन. मग सोनाली ताई (सोनाली श्यामसुंदर) बरोबर बोलणे झाले व २ दिवसात मी दादरच्या महानगरपालिकेच्या special school मध्ये शिकवायला सुरुवात केली.
शाळेत शिकवताना कळले की special मुलांना दया, करुणा दाखवून काम करण्यापेक्षा त्यांच्या क्षमता नीट समजून काम केले पाहिजे, बऱ्याचदा त्या क्षमता कमी लेखल्या जातात अथवा नसणाऱ्या क्षमतांचा बाऊ केला जातो. शाळेत शिकवायच्या अनुभवाबरोबरच research साठीच्या data collection चा अनुभव देखील मला महत्त्वाचा वाटतो. तेव्हा मला जवळून दिसले की मुलांबरोबरच पालकांना समुपदेशन व आधार गटाची प्रकर्षाने गरज आहे.
सोनाली ला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

सोनाली मेढेकर, निर्माण ७


No comments:

Post a comment