'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

सर्च ची नवी कॅन्सर रजिस्ट्रार

निर्माण ७ ची डॉ. मनवीन कौर हिने  जानेवारीपासून सर्चमध्ये कॅन्सर रजिस्ट्रार म्हणून कामाला सुरवात केली. मनवीनने औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या या निर्णयाबद्दल सांगताना मनवीन म्हणाली, “मला आधीपासूनच चांगल्या हेतूने काहीतरी करायचं होतं, ज्या कामाचा मी नसतानाही लोकांना उपयोग होत राहील. पण त्याला म्हणजे काय, कसं मोजणार आणि कशासाठी हे सर्चला आल्यानंतर लावायला सुरुवात केली. फक्त हेतू चांगला असणं पुरेसं नाही, तर कामाची सुरवातही करायची होती, त्यामुळे तीनही प्रश्नांची उत्तरे थोडी अस्पष्ट असतानाही मला गडचिरोलीला येता आलं. घरच्यांचा विरोध आहे कारण ते वेगळा विचार करतात आणि मी वेगळा. ते त्यांच्या जागी बरोबरही आहेत पण आमचे एकमत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागेल असे मला वाटते.
       कॅन्सरसारखी शहरी वाटणारी बिमारी गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात किती प्रमाणात आहे? एका  low resource setting मध्ये हे समजून घेणं किती कठीण आहे? निदान झाल्यानंतरही कॅन्सरचे सामाजिक आणि आर्थिक ओझे किती? भिती किती? ह्याच्यावर मान्य असा उपाय कोणता? ह्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात माझे काम आणि शिक्षण दोनीही सुरु आहे.”
मनवीनला तिच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

मनवीन कौर, निर्माण ७

No comments:

Post a Comment