'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

पराग राऊत सालई प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी

IGMC नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर परागने MBBS चा बॉंड पूर्ण करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात सालई (कला) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करायचे ठरवले. त्याबद्दल अधिक, त्याच्याच शब्दात...

बॉंड पूर्ण करायचा विषय आला तेव्हा कुठली जागा भरावी याबद्दल संभ्रम होता. तसं सालई (कला) माझं मूळ गाव. आमची शेती पण तिथेच आहे. वडील शेती करतात. गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आधी वाटलं होतं इथे काम केलं तर आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा लोकांना फायदा होईल सोबतच शेतीकडे पण लक्ष देता येईल. दोन्ही गोष्टी साधल्या जातील. मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे. इथं काम करायला सुरवात केल्यावर माझ्या लक्षात आलं की लोक PHC कडे सहसा येतच नाहीत. माझ्या PHC च्या अंतर्गत २४ गावे आहेत. ज्या ठिकाणी PHC आहे त्या ठिकाणची लोकसंख्या १००० च्या जवळपास आहे. ३६ अंगणवाडी, 2 अॅलोपॅथी डीसपेंसरीज आहेत. एकूण २० ते २२ हजार लोकसंख्या सामावली जाते.
पण आरोग्य सेवेचं काय? लोकांच्या आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत? लोक उपलब्ध सेवेचा पुरेसा लाभ का घेत नाही? आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे का? नाही पोहोचत तर काय अडचणी आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक आरोग्यसेवा पुरवणे म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या मी सध्या शोधात आहे. गावाच्या आरोग्याच्या समस्या काय असतात हे समजावून घेऊन आरोग्यसेवा देण्याचा माझा हा अनुभव मला पुढे काम करण्यासाठी नक्कीच कामी पडेल!

पराग राऊत, निर्माण ७

No comments:

Post a comment