'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 5 March 2017

भक्ती आणि अद्वैतला विप्रोची फेलोशिप

Wipro Applying Thoughts या उपक्रमाअंतर्गत विप्रो, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसोबत गेल्या १५ वर्षापासून काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून Wipro Seeding Programme for Educational CSOs (Civil Service Organisations) सुरु करण्यात आला. या अंतर्गत फेलोशिपसाठी दरवर्षी देशभरातून फॉर्म्स मागवले जातात. प्रोजेक्ट प्रपोजल, मुलाखत आणि सगळ्यात शेवटी final presentatiion या सगळ्या प्रक्रियेमधून गेल्यानंतर विप्रो काही ठराविक संस्थाना फेलोशिप जाहीर करते. या फेलोशिप उपक्रमाअंतर्गत ‘We The People’ च्या कामासाठी भक्ती भावे (निर्माण ४) आणि ‘वर्धिष्णू’च्या कामासाठी अद्वैत दंडवते (निर्माण ४) ला ही फेलोशिप जाहीर करण्यात आली. फेलोशिपअंतर्गत आर्थिक मदतीसोबतच अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, अझीम प्रेमजी फाउंडेशन मधून मदत, प्रशिक्षण, mentorship मिळेल. शिक्षण क्षेत्रातील नवीन संस्थांची पुढील ३ वर्षात आर्थिक घडी नीट बसवणे आणि त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवणे, हा फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे.
‘सक्रीय नागरिकत्व’ हा विषय घेऊन भक्ती गेली अनेक वर्ष We The People या संस्थेसोबत काम करत आहे. शाळेत शिकविले जाणारे नागरिकशास्त्र हे परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपुरते मर्यादित न राहता रोजच्या जीवनात वापरले जावे, यासाठी भक्ती पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शाळांसोबत काम करत आहे. त्याचसोबत भारतीय संविधानाच्या प्रमुख मुल्यांची नागरिकांना तोंडओळख व्हावी, म्हणूनही ती प्रयत्न करत असते.
जळगाव शहरातील कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी अव्दैत व त्याचे मित्र वर्धिष्णू – सोशल रिसर्च & डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून ‘आनंदघर’ नावाचे एक सायंकाळचे केंद्र चालवतात. तसेच जळगावातील काही शाळांसोबत शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे आणता येईल, याबद्दलही तो का करत आहे. कचरावेचक शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षणही काही दिवसांपूर्वी वर्धिष्णूतर्फे घेण्यात आले.
भक्ती आणि अद्वैत, दोघांचेही अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा !

भक्ती भावे, निर्माण ४                                                                              अद्वैत दंडवते, निर्माण ४

bhave.bhakti@gmail.com                                             adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a comment