'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

नमिताला ‘जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक’ ची फेलोशिप

भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी ह्यांनी २ ऑक्टोबर २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली व महात्मा गांधीना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘संपूर्णभारत देश २ऑक्टोबर २०१९ पर्यंत हागणदारी मुक्त करू  असा निश्चयकरून  एक अर्थपूर्ण आदरांजली देण्याचे ठरवले.
स्वच्छ भारत अभियानाला विविध प्रकारे मदतीचे हात मिळत असतानाच टाटा समूहाचे प्रमुख श्री रतन टाटा ह्यांनी ‘भारत सरकार’ आणि मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वोटर अंड सैनिटेशन’ ह्यांच्या सहयोगाने ‘जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक’ या एक वर्षाच्या नव्या फेलोशिपची घोषणा केली. फेलोशिप अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ६०० प्रेरक पुढील एक वर्षासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागात कार्यरत असणार आहेत
 नमिताचे काम नाशिक जिल्ह्यात असून जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या टीमबरोबर गेल्या एका महिन्यापासून तिने काम सुरु केले आहे. तालुक्यांना भेटी देऊन सरपंच, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांना स्वच्छ भारत अभियानासाठी विकसित केलेल्या मोबाईल application चे प्रशिक्षण देणे व प्रात्यक्षिके दाखवणे, application मधील जमवलेल्या माहितीचे  विश्लेषण करणे, मिनिस्ट्रीच्या वेबसाईट वरील जिल्ह्याची माहिती अपडेट करणे, सकाळी लवकर गावांमध्ये जाऊन पोलिसांच्या मदतीने उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींना गाठून त्यांना समजावणे व गरज पडल्यास ताकीद देणे, घरभेटी देऊन शौचालय न बांधण्याची कारणे जाणून घेणे व आवश्यक ती सर्व मदत करणे, जनजागृतीचे विविध कार्यक्रम गावांमध्ये राबविणे अशा अनेक जबाबदाऱ्या ती  पार पाडत आहे.
नमिताला पुढच्या कामासाठी खूप शुभेच्छा.

नमिता भावे,निर्माण ७

No comments:

Post a Comment