'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

बिजोत्सव २०१७

मागील सलग पाच वर्षापासून समाजाला विषमुक्त आणि शुद्ध अन्न लाभावे यासाठी नागपूर मध्ये एक प्रयत्न सुरु आहे तो म्हणजे बिजोत्सव. बिजोत्सावाच्या अगदी सुरुवाती पासून आपला मित्र आकाश नवघरे यात सहभागी होत आहे.  या वर्षी  ७ ते ९ एप्रिल या दरम्यान बिजोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर या वर्षीच्या बिजोत्सावामधील महत्वपूर्ण घडामोडी आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम जाणून घेऊया आकाश कडून...

बीजोत्सव हा शाश्वत आणि शोषणमुक्त समाजाच्या कामात योगदान देण्याचा एक लहानसा प्रयत्न आहे.बीजोत्सवगटाद्वारे ग्राहक ते शेतकरी थेट संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून उत्पादन -विक्री साखळीतील शोषण कमी होईल. आम्ही देशी बियाण्यांची, शेतीतील अनुभवांची एकमेकांशी देवाण-घेवाण, जनजागृती मोहिमा, विक्री व प्रदर्शनी अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो आणि वर्षातून एकदा आम्ही आपल्या प्रवासकडे मागे वळून पाहण्यासाठी एकत्र जमतो. आपले प्राधान्यक्रम काय असावे, आपल्याला नेमकं कोणत्या दिशेने जायचं आहे, त्यासाठी काय करण्याची गरज आहे आणि प्रत्यक्षात काय व कितपत करणे शक्य आहे याविषयी उहापोह करण्यासाठी; आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शाश्वततेविषयीच्या आमच्या निर्धाराचा उत्सव करण्यासाठी आम्ही एकत्र येतो.
            गेल्या ५ वर्षापासून नागपूरमधे बिजोत्सव होत आहे. यावर्षी देशी बियाणे आणि शेती याच्या थोडंसं पुढे जाऊन शाश्वततेच्या अजून काही अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केला. यावेळी शाश्वत जीवनशैलीशी अनुकूल अशी काही साधने, तंत्रज्ञान, दृष्टिकोन आणि प्रयोग यावर विशेष भर देण्यात आला.
     सेंद्रिय शेतमाल आणि शाश्वत जीवनशैली अनुकूल साधने यांच्या विक्रीमाध्यमातून यावेळेस बिजोत्सव घेण्यात आला. जवळपास ८००० लोकांनी यावेळेस बिजोत्सव मधे सहभाग घेतला. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा पण अनुभव होता कि “जो प्रतिसाद आम्हाला मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात १० दिवसात मिळत नाही त्यापेक्षा छान प्रतिसाद आम्हाला इकडे नागपूरला अवघ्या ३ दिवसात मिळाला.”  वर्षभर नागपूर मधे अन्न साक्षरता या अनुषंगाने बरच काम चालू असते, त्याचे हे फलित म्हणता येईल.     सेंद्रिय शेती का करावी? शाश्वत जीवनशैली म्हणजे काय? अश्या वेगवेगळ्या विषयांवर बिजोत्सवमधे चर्चासत्र पण घेण्यात आले. बीज संवर्धक, शेतमालावर प्रक्रिया करून विकणारे शेतकरी, देशी गवळाऊ गाईचे तूप, देशी कापसापासून बनलेली खादी, बांबू पासून बनलेल्या जीवनापयोगी वस्तू, प्रत्यक्ष शेतमाल विकणारे शेतकरी आणि संस्था इत्यादी लोकांचा बिजोत्सव प्रदर्शनी मधे मोलाचा सहभाग होता.
नागपूर गटाबद्दल बोलायचं झाल तर, आमच बिजोत्सव मधून भरपूर शिक्षण झाल आहे. स्वताच्या अन्नाबद्दल आपण किती निरक्षर आहे कळले. शेतकरी किंवा शेती संबंधित काम करणारे लोकांच महत्त्व काय आहे हे आम्हाला बिजोत्सव मधून कळले. हे काम समोर न्यायच्या अनुषंगाने आम्ही लवकरच नागपूरमधे नेहमी सेंद्रिय शेतमाल मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.                                                                                                                                                
आकाश नवघरे, निर्माण ६

No comments:

Post a Comment