'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

निर्माणी झाले परिवर्तन दूत!

Maharashtra Village Transformation Mission
ग्रामीण महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने ‘Village Social Transformation Mission’ काही दिवसांपूर्वी सुरु केले. महाराष्ट्रातल्या खेड्यांना स्वतःचा शाश्वत विकास स्वतः करता यावा, इतपत त्यांना बळ देणं आणि तशा यंत्रणा खेड्यांमध्ये उभ्या करणं हा प्रामुख्याने उद्देश असलेला हा उपक्रम आहे. यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या CSR activities ना सरकारी योजनांची आणि यंत्रणांची मदत दिली जाणार आहे. वर्ष २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील १००० खेडी स्वयंपूर्ण झालेली असतील असे ह्या मिशनचे टार्गेट आहे. १००० मॉडेल खेडी तयार करून ती नंतर महाराष्ट्रभर replicate करणे यामध्ये अपेक्षित आहे.

Chief Minister Rural Development Fellowship
या मिशनला स्थानिक पातळीवर हातभार लागावा म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात तरुणांचा सहभाग व्हावा म्हणून Chief Minister Rural Development Fellowship चे प्रयोजन करण्यात आले. त्यांना ‘परिवर्तन दूत’ असे आकर्षक नावही देण्यात आले. या फेलोशिपअंतर्गत प्रत्येक परिवर्तन दूताला एका ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि या उपक्रमात करण्यात येणारी कामे स्थानिक पातळीवर आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये राबवण्याची जबाबदारी ह्या परिवर्तन दूतांकडे असेल. ह्या सर्व परिवर्तन दूतांचे प्रशिक्षण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्याला ‘यशदा’ मध्ये नुकतेच पार पडले.
यामध्ये निर्माणच्या ६ जणांचा समावेश आहे.
रसिका बाळगे, निर्माण ५ (बेरदाबर्दा, ता. धारणी, अमरावती)
ऋतुजा जेवे, निर्माण ७ (जांभाला, ता. गंगापूर, औरंगाबाद)
कुणाल पवार, निर्माण ४ (जांभूरखेडा, ता. कुरखेडा, गडचिरोली)
रवींद्र चुनारकर, निर्माण ६ (आरकतोंडी, ता. कुरखेडा, गडचिरोली)
संकेत आहेर, निर्माण ७ (आंबटपल्ली, ता. मुलचेरा, गडचिरोली)
गजानन आंबोरे, निर्माण ७ (कोठारी, ता. मुलचेरा, गडचिरोली)


पुढील एका वर्षात आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर सर्व्हे करून विकास आराखडा तयार करून त्याद्वारे हे फेलो काम करतील. रसिका, ऋतुजा, कुणाल, रवींद्र, संकेत आणि गजाजन यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

1 comment:

  1. If any of these transformers need any technical support, I will be happy to help.

    ReplyDelete