'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

स्पर्धा दुष्काळाला हरवण्याची

महाराष्ट्राला दुष्काळ काही नवा नाही, दोन-तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते टीमने पाणी फाउंडेशन ची स्थापना केली आणि याच माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी   ‘ सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच आयोजन केल गेलं. या स्पर्धेच हे दुसर वर्ष. या स्पर्धेअंतर्गत गावातून श्रमदानाच्या माध्यमातून पाणलोट आणि मृदा संधारणाची कामे केली जातात. या वर्षी महाराष्ट्रातील ३० तालुक्यांची स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. या ३० तालुक्यांपैकी वर्धा जिल्हातील आर्वी तालुक्यात आपला मित्र मंदार देशपांडे (निर्माण ४)  तालुका समन्वयक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे.
याच स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त गावांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी मंदारने एक कल्पना वापरली होती. त्या अनुभवाविषयी आपण मागच्या सीमोल्लंघन मध्ये वाचलच आहे.
त्याच कल्पनेचा पुढील टप्पा म्हणजे गावक-यांच्या उत्साहात भर पडावी आणि त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी म्हणून मंदारने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावाच्या पाणलोट नियोजनासाठी आणि तांत्रिक सहकार्यासाठी निर्माणींना आवाहन केले. मंदारने केलेल्या आवाहना ला प्रतिसाद देत महाराष्ट्रातून २२ स्वयंसेवक आले. प्रथम २२ स्वयंसेवकांना २ दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. त्या नंतर छोट्या छोट्या टीम मध्ये विभागून वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या टीम गेल्या आणि गावाच्या पाणलोटाचा अभ्यास करून गावक-यांसोबत मिळून गावाच्या पाणलोट नियोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्यापैकी काहींचे अनुभव वाचा त्यांचाच शब्दात..."सुरुवातीचे तीन दिवस आम्ही विरुळ गावात जाऊन तिथे गावाचं भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन गावाचे नियोजन कसे करायचे आणि त्यात GPS आणि Google Earth सारख्या तंत्रज्ञानाची भूमिका काय  या सर्व बाबी शिकून घेतल्या. पुढील सात दिवस आम्ही वेगवेगळ्या छोट्या टीम मध्ये विभागून 10 ते 12 गावाचे नियोजन केलं. प्रत्येक टीम मध्ये 2-3 जण होतो. गावात जाऊन शिवार फेरी करणं, भौगोलिक स्थानानुसार उपचार सुचवणे, ग्रामसभा आयोजित करून सर्व गावकऱ्यांचा सहभाग निश्चित करणे हे आमचं काम असे.

दुष्काळाला सोबत काम करताना मी शिकलो की, गावाने पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब गावातच अडवला तर पाण्याची भूजल पातळी नक्की वाढेन आणि गाव आपला पाण्याचा दुष्काळ संपवू शकेन. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरणे गरजेचं आहे. सर्वात शेवटी, या दहा दिवसांत दुष्काळ अनुभवताना जाणवलं की, समाजाचा कोणताही प्रश्न सोडवताना, तो पाण्याचा असुदे किंवा स्वच्छतेचा जोपर्यंत गाव एकत्र येत नाही तो प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. बाहेरून कोणी व्यक्ती, संस्था येऊन त्यावर काम करत असेल तर, "हा प्रश्न आणि गाव माझा नाही अशी भावना गावात रुजली जाते".

संकेत आहेर, निर्माण ७

 "२१ मार्च ला पाणलोट आणि जलसंधारण या विषयातील तज्ञांकडून प्रशिक्षण घेतलं आणि कठीण वाटणारा पाणलोट व्यवस्थापन हा विषय  हळूहळू समजायला सुरुवात झाली. विरूळ गावात प्रवेश केल्या केल्या आमच जंगी स्वागत झाल. गावक-यांचा उत्साह आणि दुष्काळाला हरवण्याची तळमळ बघून खूपच प्रेरणा मिळाली. दुस-या दिवशी शिवारफेरी करून जल संधारणासाठी कुठले उपचार कुठल्या जागी वापरता येईल यावर बरीच चर्चा झाली. प्रत्यक्ष शिवारफेरी करून आल्यामुळे आणि पाणलोटाचे जवळून निरीक्षण केल्यामुळे कुठल्या जागी कुठल structure उभारायचं याची कल्पना आली.
 मला पाणलोट नियोजणासाठी मिळालेला गाव होत पांजरा ( बोथली). गावात गेल्यानंतर तिथल्या महिला सरपंच पण विटा भट्टी वरती मजुरी साठी जाते हे बघून नवलच वाटले. खरा भारत बघायचे असेल तर खेड्याकडे चला अस गांधीजी का म्हणत होते याच उत्तर मिळाले. आर्वी तालुक्यातील या १० दिवसाच्या कृती कार्यक्रमात उन्ह, सावली, शिवारफेरी, गावाफेरी, पाणलोट व्यवस्थापन, संभाषण कौशल्य या सारख्या किती तरी गोष्टी नव्याने शिकता आल्या."
-
जयश्री राऊत, निर्माण ७

"मी ज्या भागात राहतो त्या भागात पाण्याची अजिबात कमतरता नाही त्यामुळे कि काय मला दुष्काळ, पाणी टंचाई या सर्व प्रश्न बद्दल फार काही माहित नव्हत पण पाणी प्रश्न समजून घेणाच कुतूहल मात्र होत.  या कामाच्या माध्यमातुन मला पाणी प्रश्न समजून घेण्याची संधी मिळाली.
 आम्हाला आर्वी मध्ये दिल्या गेलेल्या प्रशिक्षणा मध्ये माझ्या बऱ्याच जुन्या गैरसमजुती दूर झाल्या. पाणी प्रश्न किती महत्वाचा? दुष्काळाचा गावातील लोकांच्या जीवनावर कसा परिणाम पडतो हे नव्या ने अनुभवायला मिळाल. १० दिवसाच्या प्रवासात ब-याच पाणलोटासंदर्भातल्या तांत्रिक बाबी मला शिकायला मिळाल्या. गावात काम करतांना कुठल्या अडचणीला तोंड द्यावे लागेल याची प्रचीती मला गावात प्रत्यक्षात काम केल्यानंतर आली. सोबतच लोकसहभागातून गावाचे बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात हे जाणवले. पाणलोट व्यवस्थापनासोबतच  विदर्भातील समाजजीवन, शेती करण्याची पद्धत, बेरोजगारीचा प्रश्न जवळून अनुभवला मिळाला."     
संजय घोरपडे, निर्माण ७

No comments:

Post a Comment