‘सामाजिक
संस्थाच्या कामात आवश्यक असलेली काम करणाऱ्या हातांची गरज भरून काढायला मदत करणारे
आणि सोबतच उद्याच्या चांगल्या समाजासाठी स्वतःचे योगदान देणारे लोक’ म्हणजेच
स्वयंसेवक (Volunteers)!
गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे, वाढत्या शिक्षणामुळे, आणि विशेषतः इंटरनेटमुळे
सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकाच्या या नात्यात सातत्याने बदल होत आहेत.
याचाच
भाग म्हणून ‘माझ्या शिक्षणाचा वापर करून मला सामाजिक कामात काही योगदान देता येईल
का?’ असा विचार करणाऱ्या युवांना, जेष्ठ नागरिकांना, आणि त्यांच्या कौशल्यांची
कामांत गरज असणाऱ्या सामाजिक संस्थांना एकत्र आणण्यासाठी इंटरनेट चा माध्यम म्हणून
प्रभावी पद्धतीने वापर करणाऱ्या संस्था पुढे येऊ लागल्या. iVolunteer ही अशीच संस्था २००२ साली सुरु झाली.
iVolunteer या संस्थेच्या कामाचे कामाचे स्वरूप
थोडक्यात -
यापूर्वी
सामाजिक कामांत मदत म्हणले की झाडे लावणे, श्रमदान, इत्यादी अकुशल कामांत सहभाग
घेणे एवढेच कामाचे स्वरूप होते. परंतू संस्थेची वेबसाईट बनवणे, त्यांच्या
कामकाजाची कार्यपद्धती निश्चित करणे, त्यांना प्रसिद्धीसाठी लागणारे व्हिडियो,
पोस्टर्स, बनवून देणे अशा अनेक कौशल्यावर आधारित कामांसाठी देखील संस्थाना मदतीची
गरज भासते. ही कामे नियमित नसल्याने त्यासाठी कायमस्वरूपी मनुष्यबळ मिळत नाही. तर
दुसरीकडे व्यायसायिक क्षेत्रात अशी कामे करणारे अनेकजण हेच काम एखाद्या सामाजिक
संस्थेसाठी करायला उत्सुक असतात. पण त्यांना या संस्था कोणत्या, त्यांच्या गरजा
कशा ओळखू? असे प्रश्न असतात. iVolunteer
ही संस्था या दोघांना एकत्र आणण्याचे काम करते.
सोबतच,
२०१३ पासून लागू झालेल्या Clause 135 of CSR and Companies Act,
2013 मुळे
अनेक उद्योगांनी, उद्योगसमूहांनी स्वतःच्या संस्थांसाठी सर्वंकष अशा CSR policies बनवायला सुरवात केली. या क्षेत्रात
हजारोंच्या संख्येत काम करणाऱ्या कर्मचार्यांचा देखील या कामांतील सहभाग मोठ्या
प्रमाणात वाढू लागला. ही कामे अधिक कौशल्याधारित आणि (सामाजिक संस्थांसाठी) अधिक
उपयुक्त करण्यासाठी देखील iVolunteer ही
संस्था काम करते.
अशा
दोन्ही प्रकारच्या स्वयंसेवकांच्या नियोजनाच्या कामासाठी केदार आडकर, iVolunteer
या संस्थेत ५ एप्रिल २०१७ पासून रुजू झाला. ‘मानवी संसाधनांचे व्यवस्थापन’ (Human Resource Management) या
विषयात पद्व्युतर शिक्षण घेतलेला केदार त्याच्या शिक्षणाच्या मदतीने सामाजिक
संस्थातील मानवी संसाधनांच्या विशिष्ट गरजा जाणून घेण्याचा आणि त्या पूर्ण करण्यात
हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. या कामाच्या अनुषंगाने कॉर्पोरेट क्षेत्र, कुशल
स्वयंसेवक आणि सामाजिक संस्था यांचा ताळमेळ कसा घालता येईल हे शोधून काढण्याची
संधी केदारला आहे.
त्याच्या
या नवीन वाटचालीसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा!
केदार आडकर, निर्माण ५
No comments:
Post a Comment