'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

READING KEEDA चे चौथे वर्ष !

पल्लवी बापटने २०१४ साली नागपूरला  सुरु केलेल्या घरघुती ग्रंथालयाचे या वर्षी चौथ्या वर्षात पदार्पण झाले! तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया तिच्याच शब्दांत...
“मी, पल्लवी बापट (निर्माण ५) आणि आदिती बैतुले (निर्माण ६) नी आमच्या उन्हाळी ग्रंथालयाला नवीन रूप देण्याचे ठरविले. लायब्ररी करिता काय काय गरजेचे आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही काही ग्रंथालयाना भेट दिली. मित्र-मैत्रिणींना आमच्या उपक्रमाबददल माहिती देत मदतीचा हात मागितला. म्हणतात ना ‘Universe is ready to give you anything, all you need to do is ASK’, त्याचप्रमाणे आम्हाला मदत जगाच्या प्रत्येक कोप-यातून मिळाली; मग ती USA हून येणारी आर्थिक मदत असो, किंवा मुंबई-पुण्याहून आलेली पुस्तकांची मदत असो. शरद आष्टेकर, आकाश नवघरे, कल्याणी कोल्हे, प्राची माकडे, प्राची वाडीभस्मे या निर्माणींनी देखील सगळ्यांनीच जमेल तशी मदत केली. नंदा काका आणि विद्या काकुंचे मार्गदर्शनही मिळाले. तसेच email द्वारे सुनील काकांनी suggestions दिले.
शाळांना भेट देऊन लायब्ररीबद्दल माहिती देणे, जवळपासच्या घरांमध्ये माहितीपत्रक वाटणे, पुस्तकांना कव्हर चढवणे, cataloguing, numbering अशा छोट्या छोट्या वाटणा-या गोष्टी आम्ही करत गेलो आणि त्यातील बारकावे शिकत गेलो. मार्चचा शेवटचा आठवडा तयारीत कसा गेला आम्हाला कळलंच नाही! १ एप्रिलला सगळ्या आप्तइष्टांच्या उपस्थितीत लायब्ररीचे उद्घाटन नंदा काका-विद्या काकूंच्या हस्ते झालं. आणि पहिल्याच दिवशी आम्हाला ७ सभासद पण मिळाले !!आमच्या लायब्ररीची वैशिष्ट्ये:
१. २ ते १५ वर्ष वयोगटासाठी
२. १००० हून अधिक इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेतील पुस्तकं आणि मासिकं 
३. मुलांकरिता विविध मनोरंजक उपक्रम 
४. पालकांसाठी ‘parent-kid duo’ सभासद योजना 
५. मराठी वाचनाला प्रोत्साहन 

आमचे शिक्षण:
१. वाचन सुरू करायला कुठलीच वयोमर्यादा नसते. Baby books पासून cloth books, board books, touchy feely books असें बरेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. 
२. विविध प्रकाशने, लेखक यांच्याबद्दल माहिती मिळाली. 
३. Book keeping हे एक science आहे हे समजलं!
आमचा FACEBOOK वर page आहे@ReadingKeedaLibrary, नक्की like करा. नागपूरला आला की लायब्ररीला भेट द्यायला नक्की या.
आमचा पत्ता- READING KEEDA, २०१, कॉर्पोरेशन टॅक्स ऑफिस समोर, शंकर नगर, नागपूर - १०
वेळ: ४ ते ७

आदिती बैतुले, निर्माण ६                                                                                      पल्लवी बापट, निर्माण ५
aditi.b29@gmail.com                                                                            drpallavi2905@gmail.com

No comments:

Post a Comment