'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

योगेश कार्यकर्ते BAIF मध्ये रुजू

निर्माण ७ चा योगेश कार्यकर्ते हा नुकताच  Bharatiya Agro Industries Foundation (BAIF) येथे रुजू झाला. तो यापूर्वी सिक्किम विद्यापीठ, गंगटोक येथे हिमनद्यांवर संशोधन करत होता. हवामान बदल, त्यांचा हिमांद्यावर होणार परिणाम तसेच हिमनद्या वितळण्याचे प्रमाण व त्याचा पाण्याची उपलब्धता व पर्यावरणावर होणारा परिणाम याचा तो अभ्यास करत होता.
BAIF ही संस्था ग्रामीण कुटुंबांसाठी विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतील घटकांसाठी शाश्वत स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करते. संस्थचे 'पर्यावरणाचे समृद्धीकरण' हे एक प्रमुख उद्दीष्ट आहे. त्याच्या आत्ताच्या कामाबद्दल सांगताना योगेश म्हणाला, “मी BAIF मध्ये नैसर्गिक संसाधनाच्या व्यवस्थापन (natural resource management) च्या प्रकल्पात काम करणार आहे. पाणलोट व्यवस्थापन करून जमिनीची धूप कमी कशी करायची, यावर कामाचा भर असणार आहे. भविष्यात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेती व इतर ग्रामीण व्यवसायांमध्ये अनेक बदल करावे लागतील. हवामान बदलांचा निसर्गावर होणार परिणाम कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवाव्या लागतील, यांचा मी अभ्यास करणार आहे.”
योगेशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

योगेश कार्यकर्ते, निर्माण ७

No comments:

Post a Comment