'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

गांधीजींच्या 'तलीस्मान'ने दाखवली दिशा

देवल सावरकर (निर्माण ५) मुळची अमरावतीची. नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नुकतेच ओडीसा मधील स्वास्थ्य स्वराज्य या संस्थेमध्ये ज्युनिअर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला सुरवात केली आहे, तिच्या या निर्णयाबद्दल तिच्याच शब्दात...

स्वास्थ्य स्वराज ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कालाहंडी जिल्ह्यातील थॉमुल रामपूर ब्लॉकच्या ७५ गावांमध्ये सर्वंकष आरोग्यसेवा देण्याचे काम करते. मुख्य दवाखान्यासोबतच तेथे दोन सब-सेन्टर्स आहेत, तेथे OPD आणि २ bed IPD आणि इमर्जन्सी रूम आहे. सोबतच प्रत्येक महिन्याला TB क्लिनिक होतं. किशोरवयीन मुलींसाठी तुलसी आणि Health Promoting School  असे उपक्रम चालतात.
तिच्या कामाबद्दल सांगताना देवल म्हणाली, “माझं काम दोन ठिकाणची OPD, IPD EMERGENCY  बघणे स्वास्थ्य साथी (health worker), फील्ड अॅनिमेटर्स आणि community नर्सेसचे ट्रेनिंग घेणे, तसेच ५ ते ६ गाव मिळून एक cluster आहे, तर महिन्याला कमीत कमी ३ cluster मध्ये नवजात बालके आणि ५ वर्षाखालील मुलांसाठी त्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करणे. अशा प्रकारचे आहे.
या भागात डोंगरिया कोंद आदिवासी आहेत आणि त्यांची भाषा कुई आहे. इकडचे वातावरण खूपच छान आहे, आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत. पण वाहतुकीची काहीच सुविधा नाही. फोनला रेंज नाही. आरोग्याची समस्या देखील खूप बिकट आहे. लोकांशी खूपच जवळचा संबंध येत असल्यामुळे त्यांच्या समस्या खूप चांगल्या प्रकारें समजून घेता येत आहेत, परिणामी पब्लिक हेल्थ खूप छान प्रकारे समजून घेता येत आहे.
मी इकडे येण्याआधी जास्त विचार नव्हता केला पण इथली परिस्थिती पाहून काम करणे खूप गरजेचे वाटले. इकडे शेती जास्त नाही, रोजगार नाही, पैसा नाही त्यासमोर आरोग्य ही गोष्ट त्यांना खूप दुय्यम वाटते. हे जरा ड्रामॅटिक वाटेल पण इकडे आल्यावर मी क्लिनिकमध्ये लिहिलेल्या गांधीजींच्या ‘तलीस्मान’ च्या ओळी वाचल्या आणि काम करण्यासाठी प्रेरित झाले. इथले प्रेमळ लोक आणि निसर्गाकडून काम करण्याची प्रेरणा मिळत राहते फक्त जेवण तेवढ demotivate करत राहतं... :D इथले काम पाहण्यासाठी आणि मला भेटायला नक्की या...
देवलला तिच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

देवल सावरकर, निर्माण ५

No comments:

Post a Comment