'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

Impact म्हणजे काय रे भाऊ? कसा मोजणार?

"नमस्कार, मी निखिल जोशी. आपल्याला निर्माण शिबिरांत नेहमी म्हणजे काय? (MK?) व कसं मोजणार? (KM?) हे प्रश्न विचारले जातात. मात्र हे प्रश्न विचारणं हेच आपले काम असेल तर? मी पानी फाउंडेशन सोबत काम सुरू केले असून त्यांच्या कामाचा परिणाम मोजणे अशी माझी जबाबदारी आहे. कामाचे स्वरूप आणि त्यामागची विचारप्रक्रिया निर्माणच्या मित्रांसोबत शेअर करावीशी वाटली...
            पानीने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने ३० तालुक्यांतील १३०० गावांत जलसंधारणाचे काम झाले आहे. मात्र एवढे काम केल्यानंतर भूजल पातळीत काय फरक पडला? सिंचन वाढले का? उत्पादन उत्पन्न किती वाढले? पशुपालन-दूधव्यवसाय इतर जोडधंदे सुरू झाले का? टँकर्सची आवश्यकता कमी झाली का? स्थलांतर कमी झाले का? पाणी या संसाधनाकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टीकोनात काय फरक पडला? गावातले लोक स्पर्धेपुरते एकत्र आले का ते स्पर्धेनंतरही एकत्र येऊन गावच्या समस्या सोडवतात? या प्रश्नांची उत्तरे मला शोधायची आहेत. निर्माणींच्या मदतीने आर्वी तालुक्यातील गावांत आम्ही नुकताच पायलट सर्वे केला. याआधारे वॉटर कपच्या पुढील आवृत्तीच्या impact evaluation ची पद्धत विकसित करण्यात येईल. सध्या मला सर्चमधील अनुभवाची खूप मदत होत आहे.


मी हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला-
·       आपले स्वप्न काय असावे? आपण मरताना काय झाले असले म्हणजे आपल्याला समाधान वाटेल? आतापर्यंतच्या ३० वर्षांचा विचार केला तर 'माणूस आणि निसर्ग यात द्वैत नसणारा समाज निर्माण झाला असेल तर' असे उत्तर मला मिळाले; कामाची दिशा मिळाली.
·       स्वप्नापर्यंत पोचण्यासाठी काम कसे करणार? पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करताना बरेचदा पर्यावरण विरूद्ध लोक असा संघर्ष निर्माण होतो. तसे करता पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांसोबत काम कसे करता येईल हे शोधले पाहिजे असे मला वाटले.
·       कोणत्या प्रश्नावर काम करणार? एकदम नवी समस्या न निवडता सर्चमध्ये काम करताना ओळख झालेल्या पाणी, घनकचरा किंवा जैवविविधतेच्या प्रश्नांपैकी एकाने सुरूवात करायची ठरवली. याच वेळी गौरी, मंदार, संतोष या निर्माणींच्या मदतीने पानी फाउंडेशन सोबत काम करण्याची संधी मिळाली.
·       कुठल्या जागी काम करणार? पाणी प्रश्नाची विविध ठिकाणची तीव्रता, कारणे, उपाय असे मोठे चित्र कळल्याशिवाय एका जागी काम सुरू करू नये असे वाटले. पानी फाउंडेशनच्या कामातून मोठे चित्र समजून घेण्याची संधी  मिळेल. सध्या पुण्यात राहून काम करत आहे, पण कायमचे पुण्यात राहण्याचा विचार नाही.
·       काम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेईन? दोन गोष्टी जपणे महत्त्वाचे वाटते- सायन्स आणि सहिष्णुता.

पानी फाउंडेशन बद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.paanifoundation.in/
पानी फाउंडेशन सोबत तालुका समन्वयक, तांत्रिक प्रशिक्षक किंवा सामाजिक प्रशिक्षक म्हणून काम करायचे असेल, तर येथे अर्ज भरा (येथे कामाचा तपशीलही वाचता येईल.) - http://www.bit.ly/watercupform
पानी फाउंडेशनच्या कामाचा परिणाम कसा मोजावा याबाबत तुमचे inputs नक्की द्या.


निखिल जोशी, निर्माण

2 comments:

 1. Myself. Upendra Dhonde , Hydrogeologist , Central Ground Water Board ,Pune
  9271000195...
  Like to discuss by meeting personally...

  ReplyDelete
 2. Myself. Upendra Dhonde , Hydrogeologist , Central Ground Water Board ,Pune
  9271000195...
  Like to discuss by meeting personally...

  ReplyDelete