सोलापूर बार्शीच्या डॉ. अमितने नुकतीच आपली सरकारी
बंधपत्रित वैद्यकीय सेवा गडचिरोली येथे पूर्ण केली. त्यानंतर त्याने छत्तीसगडमध्ये
‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेसोबत काम करण्याचे ठरवले. ऐकुया त्याची कहाणी,
त्याच्याच शब्दात...
मी डॉ.
अमित. मागचा एक वर्ष देचलीपेठा आणि जिमलगट्टा (ता. अहेरी, जि. गडचिरोली) या दोन
गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो. एप्रिल
महिन्यात सरकारी बंधपत्रित सेवेचे एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी ‘आता पुढे काय?’
हा मोठाच प्रश्न समोर होता. शेवटच्या काही महिन्यांमध्ये यावर बरीच वैचारिक घुसळण केली,
तरी नेमके उत्तर काही मिळाले नाही.
प्राथमिक
आरोग्य केंद्रांमध्ये National Health Programmes चे स्थानिक
पातळीवरचे काम करायला मिळाले. त्यामुळे Public Health कडे अधिक
आकर्षिला गेलो. मात्र जेव्हा ओ.पी.डी.मध्ये एखादी emergency केस व्यवस्थित manage
करायला नाही जमली तेव्हा स्वतःच्याच clinical knowledge च्या मर्यादांचा खूप संतापही
यायचा. त्यामुळे आपण आधी आपले पुढचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायला हवे, असेही
वाटायचे. ह्या संभ्रमात असे ठरवले की, आधी काम करायचे आणि त्यासोबतच NEET Entrance Exam चा अभ्यास करायचा. मग Post graduation की Public Health ते नंतर बघू.
अशावेळी छत्तीसगडमधील जन स्वास्थ्य
सहयोग (JSS) ही संस्था मला माझ्यासाठी खूप उपयुक्त वाटली. १ जून २०१७ ला मी येथे
रुजू झालो. इथे मी सध्या Gynaecology and Obstetrics च्या ओ.पी.डी.मध्ये काम करतोय. ह्या सोबतच प्रसूती कक्ष (labour room) आणि प्रसुतीपश्यात कक्ष (Prenatal Care ward) मध्येही काम करतो. दर शनिवारी JSS च्या शिवतराई येथील उपकेंद्रामध्ये क्लिनिकसाठी जातो. दिवसभराचा
पूर्ण वेळ हा हॉस्पिटलमध्ये आणि इतर कामामध्ये जातो, आणि रात्री काही वेळ अभ्यास
करतो.
इथे
यायच्या आधीपासूनच खूप दडपण होते कारण JSS सारख्या ठिकाणी academics ला खूप जास्त
महत्व दिले जाते. तिथे मी सहजपणे काम करू शकेन का? कामासोबतच अभ्यास करू शकेन का?
असे प्रश्न पडायचे. JSS मध्ये खूप लहानलहान गोष्टीदेखील काटेकोरपणे पाळल्या जातात. जसे की प्रत्येक
औषधाची मात्रा रुग्णाच्या वजनानुसार ठरवणे (अगदी Paracetamol सुद्धा), कोणतीही तपासणी विनाकारण न करणे, इत्यादी. आणि
याच्या अगदी उलट, वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक केसमध्ये investigation profile
आधी करून घ्यायची सवय झालेला ‘मी’ इथे त्याच आजारांकडे वेगळ्या प्रकारे पहायला,
विचार करायला शिकतोय.
अमित ढगे, निर्माण ६
No comments:
Post a Comment