'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

ऐका कुलभूषणची मुलाखत आकाशवाणीवर...

श्रोतेहो, आकाशवाणीच हे नागपुर केंद्र आहे...
चंद्रपूर जिल्हातील अतिदुर्गम समजला जाणारा तालुका म्हणजे जिवती. या जिवती तालुक्यात आपला मित्र कुलभूषण मोरे त्याच्या EARTH (Education Action Research in Tribal Health) या संस्थेमार्फत आदिवासी आरोग्याच्या प्रश्नांवरती काम करत आहे. नुकतीच कुलभूषणची ऑल इंडिया रेडीओ, नागपूर यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीत जिवती तालुक्यातील आदिवासी आरोग्याचे प्रश्न आणि EARTH या संस्थेच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न झाला.  


मुलाखतीबद्दल सांगताना कुलभूषण म्हणाला, आजपर्यंत मी अनेक मुलाखती, कार्यक्रम रेडिओवरती ऐकले होते पण माझी मुलाखत AIR घेतंय ह्याचा विशेष आनंद आणि उत्साह वाटतोय. मुलाखतीचा अनुभव फार दिव्य होता. मी आदिवासींसाठी करत असलेल्या आरोग्य सेवेच्या कामविषयी जाणून घेण्यासाठी व हे काम AIR च्या लाखो श्रोत्यांपर्यंत पोहचण्यासाठी ही मुलाखत झाली ह्याचा विशेष आनंद होतो आहे.”
कुलभूषणच्या या मुलाखतीचे प्रक्षेपण दि. १७/०९/१७ रविवार सायंकाळी ६.२० मिनिटांनी घरकुल या कार्यक्रमात होईल तर आपण नक्की ऐकुया...


                                                                                                                कुलभूषण मोरे, निर्माण ५


No comments:

Post a Comment