'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

विक्रम मस्के ‘CAPS’ मध्ये रुजू

निर्माण ७ चा विक्रम मस्के नुकताच CASP(Community Aid & Sponsorship Programme) या संस्थेत रुजू झालाय. MSW झाल्यानंतर लगेचच लहान मुलांसोबत काम करण्याचा निर्णय घेणाऱ्या विक्रम कडून जाणून घेऊया त्याच्या संस्थेबद्दल आणि कामाबद्दल...   

CASP (Community Aid & Sponsorship Programme) ही संस्था गेल्या ४३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यात गरजू घरातील शिकणाऱ्या मुलांसाठी काम करीत आहे. मुलांना शैक्षणिक मदत देणे, त्याचबरोबर महिला व मुलांमधील कौशल्य वाढीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी CASP संस्था वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबवित असते.
मी CASP या संस्थेत नॉर्मा स्कूल वॉश या प्रकल्पावर Cluster Co-ordinator म्हणून काम करत आहे. हा प्रकल्प CASP आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चालतो. या प्रकल्पामध्ये एकुण ५० शाळांचा समावेश आहे. तसेच या शाळांमध्ये येणारे मुले ज्या वसाहतींमधून येतात त्यापैकी ३ वसाहतींचाही समावेश या प्रकल्पामध्ये आहे. मी ग्रामीण व शहरी भागातील पाच शाळा आणि शहरी भागातील एक community येथे काम करतो. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा बालमंच तयार करणे व त्यांच्यामार्फत शाळेतील मुलांसोबत WASH (Water, Sanitation & Hygiene) या विषयावर काम करतो. त्यात मुलांमध्ये WASH विषयी संवाद साधणे त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या वेगवेगळ्या Activity घेणे, इ. काम चालते. तसेच मुला-मुलींसाठी वॉशच्या सुविधा पुरवणे (पाणी फिल्टर, इन्सिनिरेटर - सॅनिटरी पॅड जाळण्यासाठीचे यंत्र, इ.). यासोबतच बालमंच, शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्या मिटिंग घेणे आणि पाणी, स्वच्छता, आरोग्य याविषयी संवाद साधला जातो. इ. काम शाळापातळीवर चालते.
तसेच community मध्ये WASH च्या सुविधा पुरवणे आणि त्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे इ. काम चालते. तेथील Stakeholders च्या मदतीने कम्युनिटीमधील काम केले जाते. हे काम करत असताना खूप चांगला अनुभव मिळत आहे.निर्माणच्या शिबिरामध्ये विनोबांचा एक लेख वाचायला मिळाला होता. त्यात विनोबांनी सांगितल्याप्रमाणे ‘कृतीतून शिक्षण’ घेणं हे मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. आणि सोबतच मुलांसोबत काम करत असताना आनंदही मिळत आहे.


विक्रम मस्के, निर्माण ७
vikrammaske2151@gmail.com

No comments:

Post a comment