'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

सागर , प्राची आणि अपूर्वा यांची SBI Youth for India फेलोशिपसाठी निवड

SBI (State Bank of India) च्या CSR अंतर्गत चालणाऱ्या Youth for India या फेलोशिपची सुरुवात २०११ साली झाली. या फेलोशिपअंतर्गत दरवर्षी पूर्ण भारतातून कोणत्याही शाखेच्या पदवीधर असलेल्या २१ ते ३२ वयोगटातील १०० युवांची निवड केली जाते. मुख्यता ग्रामीण भारतातील समस्या सोडवण्यासाठी हातभार लागावा म्हणून सुरु झालेल्या या फेलोशिपची प्रमुख २ उद्देश आहे, त्यातील एक म्हणजे ग्रामीण भागातील समस्येवर काम करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित युवांना संधी उपलब्ध करून देणे आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भारतातील विकास प्रकल्पांवर काम करणा-या स्वयंसेवी संस्थांना अधिक कौशल्यपूर्ण आणि सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
            १३ महिन्याचा कार्यकाळ असणाऱ्या या फेलोशिपसाठी दरवर्षीप्रमाणे मे महिन्यामध्ये भारतभरातून ऑनलाइन फॉर्म मागवण्यात आले. त्यांनतर निवडक अर्जदारांच्या मुलाखती झाल्यानंतर निर्माणच्या सागर बेंद्रे (निर्माण ७), प्राची माकडे (निर्माण ७) आणि अपूर्वा  घुगे (निर्माण ५) यांना फेलोशिप जाहीर झाली.
            पुढील एक वर्षासाठी प्राची आणि अपूर्वा ह्या ओरिसामध्ये असलेल्या कालाहंडीतील ग्राममंगलया संस्थेसोबत, तर सागर BAIF या संस्थेसोबत मध्यप्रदेशमधील बैतुल येथे काम करणार आहे.
            पुढील एक महिन्यासाठी कामाचे स्वरूप संस्थेच्या कामांबद्दल माहिती घेणे, विविध संभाषणाद्वारा, क्षेत्रभेटीद्वारा या प्रदेशाचे प्रश्न समजून घेणे आणि नंतर येथील लोकांची गरज, व उपलब्ध संसाधने या सर्वांचा विचार करून पुढील ११ महिन्यांसाठी कृती आराखडा बनवणे असे आहे.

या तिघांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!                                 


                                                                                                                                           सागर बेंद्रे, निर्माण ७

प्राची माकडे, निर्माण ७

अपूर्वा घुगे, निर्माण ५


                                                                                                                             

No comments:

Post a Comment