'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

पवन-कल्याणी यांची बिजापूर, छत्तीसगढ येथे कामास सुरूवात!

तीन वर्षे शहीद हॉस्पिटल, दल्लीराजहरा येथे काम केल्यानंतर पवन मिल्खे (निर्माण ३) आणि कल्याणी राऊत (निर्माण ५) हे निर्माणी जोडपं जिल्हा रुग्णालय, बिजापूर, छत्तीसगढ येथे ऑगस्ट २०१७ पासून रुजू झाल आहे. पवन (MBBS) डॉक्टर आहे, तर कल्याणी इंजिनीअर. त्यांच्या या नवीन कामाबद्दल...
छत्तीसगढ राज्याच्या दक्षिणेला वसलेला, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेला, बस्तर भागातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, निसर्गसौंदर्याने नटलेला जिल्हा म्हणजे बिजापूर. येथे मुख्यतः गोंड, मुरीया, हल्बी या आदिवासी जमाती आणि यांच्या सोबतच तेलगु, मराठी आणि हिंदी भाषिक लोक राहतात. घनदाट वने, डोंगराळ भाग यामुळे विरळ लोकवस्ती आहे आणि गावांमध्ये accessebility खूप कमी आहे. आदिवासी भागात सर्वसाधारणपणे असणाऱ्या सर्वच समस्या येथे आहेत, पण समस्यांची तीव्रता येथे अधिक वाटते. (प्राथमिक आरोग्य केंद्र, मन्नेराजाराम, गडचिरोली आणि शहीद हॉस्पिटल, दल्लीराजहारा, छत्तीसगढ येथील माझ्या कामाच्या अनुभवानुसार) आरोग्य सेवेबाबतची अनास्था, पारंपारिक व्यवस्थेवरचा विश्वास ह्या येथे आरोग्याच्या मला मुख्य समस्या वाटतात. त्यामुळे लोकं दवाखान्यात आणि आरोग्य सेवांकांकडे येत नाहीत.
मी जिल्हा रुग्णालयला मेडिसिन विभागात मेडीकल ऑफिसर म्हणून सध्या काम करतोय. त्यामुळे माझं काम हॉस्पिटलमध्ये OPD, indoor ward, emergency ward आणि post-mortem सांभाळण्याचे असते. Medicine department मध्ये आम्ही मुख्यतः मलेरिया, डायरिया, viral fever, scabies, fungal infection, hypertension, diabetes, cerebral malaria, snake bite, stroke, cardiac diseases या सोबतच ambush IED blast मध्ये injured झालेल्या पोलीस जवानांचे उपचारदेखील केले जातात.
कल्याणी National Rural Health Mission (NRHM) अंतर्गत RKSK (Rashtriya Kishor Swasthya Karyakram) उपक्रमामध्ये master trainer म्हणून रुजू झाली. मुख्यतः ‘पोटा केबिन’ (घोर नक्षलग्रस्त बस्तर भागात मुला-मुलींसाठी छत्तीसगढ सरकारने तयार केलेल्या शाळा), आश्रम शाळा व जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींबरोबर common endemic diseases, sexuality-sexual behavior and gender, social sensitization या विषयांचे module तयार करणे, त्यावर चर्चा करणे आणि शाळेतील  शिक्षक, अंगणवाडी वर्कर, ANM आणि ‘पोटा केबिन’ पर्यवेक्षक यांना या modules चं ट्रेनिंग देण्याची जबाबदारी कल्याणीकडे आहे.
विकासाचा अभाव आणि अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला बिजापूर जिल्हा मागील दोन वर्षापासून सुधारत आहे. जिल्ह्यात बनलेल्या नवीन रस्त्यांमुळे accesibility वाढली आहे, जिल्हयामध्ये सुसज्य व सर्व आधुनिक सोयी असलेले जिल्हा रुग्णालय तयार झाले आहे. म्हणून काम खडतर जरी असलं तरी त्यासाठी प्रेरणा ही मिळत राहते.

पवन-कल्याणीला त्यांच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा!
पवन मिल्खे, निर्माण ३ 

कल्याणी राउत, निर्माण ५

No comments:

Post a Comment