'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 8 November 2017

डॉ. आकाश शिंदे Jhpiego मध्ये Advance Family Planning प्रोजेक्ट अंतर्गत रुजू

आपल्या Jhpiego मधील नव्या कामाबद्दल सांगतोय आकाश शिंदे...

MPH (Master’s in Public Health) केल्यावर मी गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील SEWA Rural या संस्थेमध्ये कामाची सुरवात केली. तिथे मला ग्रामीण आणि आदिवासी भागात Health Program Implementation चा अनुभव मिळाला. सप्टेंबर महिन्यात मी पुण्यात Jhpiego (Johns Hopkins University Affiliate) या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये Advance Family Planning (AFP) या प्रोजेक्ट अंतर्गत Program Coordinator म्हणून जॉईन झालो आहे.
Jhpiego ही संस्था आरोग्य कार्यकर्ते, सरकार आणि समाजातील नेत्यांसोबत लोकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्याच्या उद्देशाने काम करते. ४० वर्षांपासून १५५ देशांत मातामृत्यू दर कमी करण्यासाठी ही संस्था काम करत आहे.
मी पुणे जिल्ह्यातील फॅमिली प्लानिंग संबंधित वेगवेगळे स्टेक होल्डर्स- जसे की सरकारी कर्मचारी आणि NGOs (उदा. FOGSI, IPAS आणि FPAI) यांच्यासोबत काम करत आहे. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश उत्कृष्ट दर्जाच्या कुटुंब नियोजन सेवा मिळण्यासाठी आर्थिक गुंतवणूक आणि political commitment साठी advocacy करणे हा आहे. या प्रोजेक्टमध्ये आम्ही District Family Planning Working Group (DWG) बनवलाय. हा ग्रुप दर तीन महिन्यांनी भेटतो व कुटुंब नियोजनाच्या सुविधा सुधारण्यासाठी, तसेच त्यांचा लोकांमध्ये प्रसार करण्यासाठी काय कृती करता येईल यावर चर्चा करतो. इथे आम्ही SMART objectives बनवून घेतलेत जे नेमके काय काम करायचे आहे याबद्दल मार्गदर्शन करतात.
मी या प्रोजेक्टमध्ये बेसलाईन डेटा गोळा करणे, रिपोर्टिंग करणे आणि DWG च्या सदस्यांसोबत ठरवलेले उपक्रम पूर्ण करण्यासाठी समन्वयन करणे इ. जबाबदा-या सांभाळतो. तसेच या प्रोजेक्टअंतर्गत पुणे जिल्ह्यात संशोधनासंबंधी कामही करत आहे.
माझ्या आधीच्या SEWA Rural मधील कामापेक्षा हा प्रोजेक्ट वेगळा आहे. इथे स्वतः प्रत्यक्ष काम न करता स्टेक होल्डर्सकडून अपेक्षित काम करवून घेणे हा माझ्या कामाचा मुख्य भाग आहे. हे करत असताना मला स्वतःमध्ये प्रभाविपणे बोलण्याची क्षमता आणि संयम या गोष्टी विकसित करायला मदत मिळत आहे.

आकाशला नव्या कामासाठी मनापासून शुभेच्छा!

आकाश शिंदे, निर्माण ६

No comments:

Post a comment