'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 17 January 2018

जिवतीचे आरोग्यदूत

यशदाने (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) केलेल्या अभ्यासानुसार संपुर्ण महाराष्ट्रातील दुर्गम आणि अविकसित तालुक्यांपैकी सर्वांत मागास तालुका म्हणजे चंद्रपूर जिल्हातील जिवती. (Deprivation index - 60.29) याच जिवती तालुक्यामध्ये निर्माण ४ चा आपला मित्र कुलभूषण मोरे आपल्या अर्थ’ (Education Action Research in Tribal Health) या संस्थेमार्फत आरोग्याच्या प्रश्नांवरती काम करत आहे. आरोग्यसेवा ही फक्त शहरापुरती मर्यादित न राहता तिचे खेडोपाडी विकेंद्रीकरण झाले पाहिजे या उद्देशाने काम करत असलेल्या अर्थ संस्थेने जिवती तालुक्यातील ज्या गावामध्ये आरोग्याची परिस्थिती बिकट आहे अशा गावांमध्ये आरोग्यदूत नेमले आहेत.
आरोग्य स्वराज्याचे स्वप्न पुढे ठेवून नेमलेल्या आरोग्यदूतांचीकार्यशाळा ९ डिसेंबर २०१७ ला जिवती येथे संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये क्षयरोग आणि इतर संसर्गजन्य रोगावरील उपाययोजनेबाबत संवाद साधला गेला. कार्यशाळेला जिवती तालुक्यातील १५ गावाचे आरोग्यदूत मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

               कुलभूषण आणि अर्थ टीमला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
     
   कुलभूषण मोरे, निर्माण ४
kulbhushanmore@gmail.com

No comments:

Post a Comment