'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

सुयश तोष्णीवाल सर्चमध्ये रुजू

Persistent Systems या सुप्रसिद्ध आयटी कंपनीत काम करत असलेल्या सुयशने (निर्माण ७) नुकताच आपल्या कामाचा राजीनामा दिला. मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा असलेला सुयश शिक्षणाने इंजिनिअर आहे. फेब्रुवारी महिन्यापासून त्याने सर्चमध्ये संशोधन विभागात सॉफ्टवेअर आणि सोशल मीडिया असोसीएट म्हणून कामाला सुरुवात केली.
सुयशच्या निर्णयाबद्दल विचारले असता तो सांगतो की, “मी शाळेत असल्यापासूनच शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो. पुढे एन सी सी, एन एस एस, महाराष्ट्र अंनिसमध्ये सक्रियपणे काम केले. हे काम करत असताना अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करायचे, हे डोक्यात पक्के होत होते. पण घरातील आर्थिक परिस्थितीमुळे निर्णय घेता येत नव्हता. आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी काही काळ आयटी क्षेत्रात नोकरी करावी, असा विचार करत असतानाच Persistent Systems मध्ये माझी निवड झाली. Persistent Systems मधील कामाला सुरुवात करण्याआधी मी निर्माणच्या शिबिरात आलो होतो. निर्माणमधील विविध सत्रांमधून वैचारिक स्पष्टता येत गेली. याकाळात माझा Persistent मधील नोकरी सुरूच होती. दरम्यान भविष्याबाबत पडणाऱ्या प्रश्नांना म्हणजे काय?’, ‘कसं मोजणार?’, ‘कशासाठी?’ लावल्यावर हा जॉब न करण्याबाबतची पूर्ण स्पष्टता आली. योगायोगानेच सर्चमध्ये  सॉफ्टवेअर आणि सोशल मिडिया असोसीएटची जागा रिक्त होती. हे समजल्यावर मला खूपच आनंद झाला कारण माझ्या शिक्षणाचा वापर तर येथे होणारच होता आणि आवडीचे काम पण होते. सर्चमध्ये माझी निवड झाल्यानंतर Persistent Systems मध्ये राजीनामा सहज देऊन टाकला. मी ज्या कारणासाठी कंपनी सोडत आहे ते ऐकून शेवटच्या दिवशी माझी एक छोटीसी मुलाखत घेण्यात आली. नंतर कंपनीच्या सर्व १०,००० कर्मचाऱ्यांना ती पाठवण्यात आली, आणि कंपनीच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. मला तर नोकरी सोडूनसुद्धा सेलिब्रेटी झाल्यासारखे वाटत होते!
सध्या सर्चमध्ये संशोधन, सामाजिक काम करत असलेल्या माझ्या सहकार्यांच्या कामात सहजता आणण्यासाठी व सर्चचा विस्तार आणखी झपाट्याने वाढवण्यासाठी तंत्रज्ञान जास्तीत जास्त कसं वापरता येईल, यावर माझा पुढील काळात भर असेल.
सुयशला त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा!                                         
                                                                                                        

                                                                                                     सुयश तोष्णीवालनिर्माण ७
                                                                                                suyash.toshniwal@gmail.com
  

6 comments:

 1. सुयश, जिथे जाईल तेथे भक्कम काम उभे करणार हा विश्वास आहे. त्याच्या पुढील कामास सदिच्छा!

  ReplyDelete
 2. सुयश, जिथे जाईल तेथे भक्कम काम उभे करणार हा विश्वास आहे. त्याच्या पुढील कामास सदिच्छा!

  ReplyDelete
  Replies
  1. कृष्णात सर मनःपूर्वक धन्यवाद!

   Delete
 3. मनाला आनंद देणाऱ्या कामात स्वतःला झोकुन देण म्हणजे काय असत, हे सुयश ने घेतलेल्या निर्णयाकडे पाहुन म्हणावस वाटतं. All the best suyash

  ReplyDelete
  Replies
  1. शिंदे सर मनःपूर्वक धन्यवाद!

   Delete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete