'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 9 July 2018

मयूर आणि हेमेंद्र नवे ‘करके देखो फेलो’

शेतीसाठी माती परीक्षण करणे आणि खतांचे प्रमाण ठरवून रासायनिक खतांचा भडीमार टाळणे हे आव्हान घेऊन निर्माण ८ चा मयूर तांबे शेतीला बळकटी कशी देता येईल यावर काम करत आहे. Digital Impact Square या उपक्रमात सहभागी होऊन त्याने आणि त्याच्या साथीदारांनी ‘श्रमभूमी’ हा स्टार्टअप सुरु केला आहे; ज्यात मुख्यत्वे शेतकऱ्यांना स्वस्त दरात माती परीक्षण, खतांच्या बाबतीत मार्गदर्शन आणि प्लानिंग करून दिले जाते. शिक्षणाने इंजिनिअर असलेला मयूर मूळ संगमनेरचा आहे आणि सध्या नाशिकमध्ये काम करतो. माती परीक्षणाचे पोर्टेबल उपकरण बनवण्याचा मयूर सध्या प्रयत्न करत आहे.
            पालघरचा हेमेंद्र चौधरीने ह्या वर्षी पासूनवयमया संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली. इंजिनिअरींगमध्ये शिक्षण झाल्यानंतर हेमेंद्र भोईसरमध्ये एका कंपनीत २ वर्षे काम करत होता. निर्माण शिबीर झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे  निश्चित झाले आणि पालघरमध्येच राहत असल्याने आदिवासी प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘वयमया संस्थेशी त्याचा संपर्क झाला. जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांमधून स्थलांतर कमी करण्यासाठीवयम’नेस्वस्थ्य’ हा उपक्रम सुरु केला. हेमेंद्र त्या उपक्रमात पुढील वर्षभरात विविध भूमिका सांभाळणार आहे. गावातील सामुहिक आणि वैयक्तिक जमिनीतील पिकांची माहिती गोळा करणे, जमिनींची मोजणी करणे, गावातील नैसर्गिक साधन संपत्ती यांची जैवविविधता यांची माहिती ठेवणे, People Biodiversity Register तयार करणे, जल व्यवस्थापनाचा आराखडा बनवणे, विविध विकास कामांचे प्रस्ताव आणि आर्थिक अंदाजपत्र बनवणे, . अशा जबाबदाऱ्या त्याच्याकडे आहेत.
            दोघांना त्याच्या कामात मदत व्हावीकरके देखोफेलोशिप देण्यात आली आहे. मयूरला आणि हेमेंद्रला त्यांच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा!


                                                                                                                            मयूर तांबे, निर्माण ८

हेमेंद्र चौधरी, निर्माण ८


No comments:

Post a comment