'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 12 October 2018

काही प्रश्न


एखाद्या कुरूप मुलीच्या डोळ्यांनी
पाहिलं आहे का कधी सांजेचं सौंदर्य

सर्वोत्तम धावपटूच्याही पुढे
धावला आहात का लंगड्याच्या उमेदीनं
भुकेकंगालाच्या पोटानं कधी
आस्वादलं आहे का भाकरीचं लावण्य

घाव घालून थकल्यावर
कुऱ्हाड घेऊन विसावलेल्या दुश्मनावरही
धरली आहे का झाडाच्या मायेनं सावली

रात्रभर जळून विझताना
दिव्यांच्या डोळ्यांनी तुम्हाला
झाले आहेत का कधी पहाटेच्या उजेडाचे भास

एकाकी मरणासन्न बापाच्या जर्जर कानांनी
तुम्ही घेतली आहे का कधी
दूर शहरात मश्गुल लेकरांच्या पावलांची चाहूल

झाड मोडून पडल्यावर
पुन्हा पुन्हा परतला आहात का कधी कुठे
उध्वस्त आकाशात पाखराच्या आशेनं

मुलीच्या शाळेचा खर्च, आईची औषधं
दलालाचे इतके अन खाटेचं भाडं वेगळंच
तुम्ही करून पाहिला आहे का कधी
वेश्येचा संभोगरत हिशोब
-         नागराज मंजुळे

No comments:

Post a Comment