'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 12 October 2018

केदार अडकर पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेच्या मनुष्यबळ विभागात रुजू


सामाजिक संस्थांच्या पडद्यामागे असलेला व्यवस्थापनाचा भार सुरळीत चालवणे आणि त्यातून संस्थेच्या कामाची गुणवत्ता सुधारणे या विचाराने गेली अनेक वर्ष केदार अडकर (निर्माण ) विविध सामाजिक संस्थांसोबत काम करत आहे. केदारने व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याच्या नवीन कामाबद्दल तो सांगत आहे...
            तर ऑक्टोबर २०१६ मध्ये सर्चमधून मी पुण्याला परत आल्यावर, सामाजिक संस्थांचं मनुष्यबळ व्यवस्थापन (Human Resource Management) कसं अधिक सुदृढ करता येईल, त्यात मला काही योगदान देता येईल का या विचारात मी होतो.  सामाजिक संस्थाना मनुष्यबळ व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था आहेत का? त्यांच्यासोबत हे काम करता येईल का? की फ्री लान्स कन्सल्टंट म्हणून हे काम कराव? की एखाद्या संस्थेत स्वतः रुजू होऊनच हा बदल घडवावा लागेल? की कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापन निष्णात, आणि सामाजिक कामात हातभार लाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या आणि सामाजिक संस्थांमधला दुवा म्हणून काम करावं? असे वेगवेगळे विकल्प डोक्यात येत होते.
            त्यातलाच शेवटचा विकल्प कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्था यांची सांगड घालणंकरून पाहण्याची संधी मला माझ्या याधीच्या (म्हणजे या कामाबद्दल अजून लिहायला सुरवातच केली नाहीये.. नमनाला घडाभर तेल) iVolunteer सोबतच्या कामातून मिळाली. यासाठी मी एका उत्पादक कंपनीच्या CSR विभागासोबत कामासाठी रुजू झालो. काम चांगल होत. कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्थांची ‘skill volunteering’ च्या माध्यमातून सांगड घालून देता आली. पण कॉर्पोरेटचा या कामातील एकूणच (नीरु)उत्साह इतका होता की खूप कामच नसायचं रोज करायला. केलेल्या कामाचं रिपोर्टिंग व्हायचं नाही, खर्चाच ऑडीट व्ह्यायचं नाही, आणि पुरेसं काम नसलं की मग काहीबाही काम माग लागायची. थोडक्यात कॉर्पोरेट CSR चं आणि माझं काही जमेना. शेवटी एक वर्षाचा करार असलेल्या या कामाला मी महिन्यातच राम राम ठोकला आणि नवीन काम शोधायला सुरवात केली. (खरतर एक वर्ष टिकून राहायला पाहिजे होत मी तिथं, याआधी कधी मी इतक्या लवकर घेतला वसा टाकला नव्हता, पण जामच बोर व्हायला लागलं काम कमी आणि सोंग फारकरण्यात)
            तर सध्या (मे २०१८ पासून) मी स्वच्छनावाच्या कचरावेचकांच्या सहकारी संस्थेत मनुष्यबळ आणि व्यवस्थापनविभागात रुजू झालो आहे.

SWaCH संस्थेबद्दल थोडक्यात -
            शहरात प्रत्येक घरामागे दरदिवशी सरासरी ५०० ते ७५० ग्रॅम कचरा निर्माण होतो. (शहराच्या लोकसंख्येनुसार एकूण कचऱ्याचा अंदाज लाऊ शकाल) सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत हा कचरा आणि त्याच व्यवस्थापन हा सर्वच शहरांत, शासन यंत्रणेत, राजकीय वर्तुळात अगदी कळीचा विषय झाला आहे. पण या प्रश्नांवर वर्षानुवर्षे काम करणारे कचरा वेचकआजही व्यवस्थेत उपेक्षित आहेत. ते कोण आहेत, कुठे राहतात, कसे जगतात याबद्दल संपूर्ण अज्ञान असल्याने त्यांच्याकडे लोक संशयित नजरेनेच पाहतात. खरतर ते जो कचरा गोळा करण्याचं काम करतात ती काही चोरी नाही. उलट त्या कचऱ्यातून रिसायकल होऊ शकणारा कचरा वेगळा केल्यामुळे तेवढा कमी कचरा landfill ला जातो. पण आपल्या (So called) बुद्धीजीवी समाजात त्यांच्या श्रमांना आणि त्या श्रम करणाऱ्या लोकांना काहीही स्थान नाही.
            अशा या काम करणाऱ्या हातांना मेनस्ट्रीममध्ये घेऊन येण्याच्या उद्देशाने कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ (KKPKP) या कचरा वेचाकांच्या पहिल्या कामगार संघटनेची स्थापना १९९३ मध्ये झाली. सध्या अंदाजे ९००० हून अधिक सभासद असलेली ही संस्था स्वच्छया (सध्या मी काम करत असलेल्या) संस्थेची parent organization आहे. KKPKP बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.kkpkp-pune.org/ ला भेट द्याल.
            २००० ाली केंद्र शासनाने घन कचरा व्यवस्थापनासाठी ‘Municipal Solid Wastes (Management and Handling) Rules, 2000’ (http://www.moef.nic.in/legis/hsm/mswmhr.html) लागू केले. ज्यानुसार कचऱ्याचे वर्गीकरण करण, कचऱ्याचे दरोदारातून संकलन करणे आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे या तिन्ही गोष्टी अनिवार्य झाल्या. आणि या कामासाठी स्वच्छ संस्थेची २००७ साली स्थापना झाली. सध्या पुणे महानगर पालिकेसोबत केलेल्या करारानुसार स्वच्छ संस्थेचे ~,००० कचरावेचक पुण्यातील ~,००,००० घरांतून दिवसाला ~१०५० मेट्रिक टन कचरा वर्गीकृत (ओला व सुका वेगळा) करून उचलतात आणि त्यातील पुनरुत्पादन होऊ न शकणारा कचरा शासनयंत्रणेपर्यंत पोहचवतात. (पुणे शहरात दिवसाला एकूण २००० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो). स्वच्छबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्वच्छची वेबसाईटला (www.swachcoop.com) भेट द्याल...

तर आता थोडं माझ्या कामाबद्दल
            स्वच्छचे सभासद असलेल्या या ,००० कचरा वेचाकांच्या दैनंदिन कामात सुसूत्रता यावी, त्यांच्या कामातील अडचणी कमी व्हाव्या आणि कामाची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून त्यांच्यासोबत स्वच्छचे कार्यकर्ते काम करतात. यात फिल्डमधील कामातील नियोजनासाठी ९० प्रभाग समन्वयक, १४ वार्ड समन्वयक, आणि ४ झोन समन्वयक अशी टीम तर ऑफिसमधील कामांसाठी अकाउंट्स, डेटा, आउटरिच, आणि एचआर-अॅडमीन अशी ४० जणांची टीम काम करते. माझं काम आहे या १०० फिल्ड स्टाफ आणि ४० ऑफिस स्टाफसाठीच मनुष्यबळ व्यवस्थापन पहाणे. हे काम करणारी आमची जणांची टीम आहे त्यातच मी देखील आहे. नवीन कर्मचारी भरती, त्याचं इंडक्शन (इंडक्शनसाठी चांगला मराठी प्रतिशब्द सापडला नाही) करणे, कामाचा नियमित आढावा घेणे, विविध कामांच्या मानक प्रक्रिया SOPs लिहून काढणे आणि त्याप्रमाणे काम होण्यासाठी प्रणाली बसवणे, कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या मासिक अहवालात गुणात्मक सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांसाठी आखलेली नियमावली आणि धोरणे (स्टाफ पोलिसी) सातत्याने सुधारणे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोप्या शब्दात मांडणे, संवादाचे पर्याय तयार करणे, कामाच्या उद्दिष्टांत अधिक स्पष्टता आणण्यासाठी संवाद साधणे, अशा कामांत माझा सहभाग आहे.
            काम सुरु होऊन सप्टेंबरमध्ये महिने झाले आहेत आणि काम आवडत आणि जमतंही आहे. आणि ते करताना सामाजिक संस्थांचं एचआर कसं असावं याबद्दलची माझी समज हळू हळू सुधारत जाईल अशी आशा आहे.
तर असं आहे सगळं!
                                                                                                                                                                                                                                                                                         केदार आडकर, निर्माण ५
No comments:

Post a Comment