'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

कल्पतेश देशमुखचे स्नेहालय संस्थेसोबत काम सुरु

अनाथ, एच.आय.व्ही. / एड्स बाधित तसेच झोपडपट्टीतील मुलांचा सांभाळ, संगोपन व उपचार करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मागील ३० वर्षापासून स्नेहालयही संस्था अहमदनगर येथे काम करत आहे.
मुख्यत्वे लहान मुले आणि महिला यांना विचारात घेऊन ‘स्नेहालय’ संस्थेचे बाल संगोपन, समुपदेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, इ. असा विविध १९ प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरु आहे. जळगाव जिल्हातील चाळीसगावचा कल्पतेश देशमुख (निर्माण ८) याने नुकतीच स्नेहालय संस्थेसोबत कामाला सुरुवात केली आहे. कल्पतेशचे सामाजिक काम या विषयात पदव्युत्तर शिक्षण (एम.एस.डब्लू.) झालेले आहे.
कल्पतेशकडे दत्तक संगोपनाची संकल्पना समाजात समजावून सांगणे, बाळ दत्तक घेवू इच्छिणाऱ्या कुटुंबांची योग्य ती तपासणी करणे, पालकांचे व बालकांचे समुपदेशन करणे अशी महत्वाची जबाबदारी असणार आहे.
कल्पतेशला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!

कल्पतेश देशमुख, निर्माण ८
                                                                                                        deshmukhkalptesh@gmail.com

No comments:

Post a comment