'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

प्रियांकाला Learning Companions Fellowship

नागपूरमधल्या शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी Learning Companions Fellowship दिली जाते, या फेलोशिप अंतर्गत प्रियंका घरात (निर्माण ८) हिने कामाला सुरुवात केली आहे. मुळची नागपूरची असलेली प्रियंका शिक्षणाने इलेक्ट्रीकॅल इंजिनीअर आहे.
या फेलोशिप अंतर्गत शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नाची गंभीरता विचारात घेऊन शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच, नवीन उपक्रमाद्वारे शिक्षणाविषयी मुलांमध्ये आवड आणि गोडी निर्माण करणे, मुलांच्यासामाजिक  अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे, मुलांची मानसिक स्थितीचा विचार करून त्यांना योग्य ती मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या प्रश्नांवर प्रियंकाचे काम सुरू झाले आहे. या व्यतिरिक्त मुलांची सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामात पण प्रियंकाचा सहभाग असणार आहे.
प्रियंकाला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!

प्रियंका घरात, निर्माण ८

No comments:

Post a comment