'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013

रेखा देवकुळेच्या गावात निर्माण गटाच्या मदतीने सार्वजनिक स्वच्छता शिबीर


सोलापूरच्या निर्माण गटाने नुकतेच जिल्ह्यातल्या दारफळ या गावामध्ये एक शिबीर घेतले. बी. बी. दारफळ हे गाव सोलापूरपासून २५ किमी अंतरावर आहे. गावामध्ये मुख्यतः सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांची व्यवस्थेविषयी प्रश्न आहेत. यासोबतच गावामध्ये राहणाऱ्या युवकांना वेगवेगळे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रेरित करणे हा मुख्य विषय शिबिरात घेण्यात आला. सोलापूर गटातील रेखा देवकुळे या युवतीने हे शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला सोलापूरच्या सर्व निर्माणींनी मदत केली व सहभाग दर्शवला. नागपूरच्या रंजन पांढरेने गावातील युवकांचे शौचालये व त्यासाबंधी सरकारी योजना यावर सत्र घेतले.  शिबिरादरम्यान गावातील युवकांनी एकत्र येऊन श्रमदान केले व त्यायोगे स्वच्छतेची समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. रेखा व सोलापूर गटाच्या या प्रयत्नांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

No comments:

Post a comment