'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013

धुळे दंगलीचा अभ्यास करण्यासाठी सागर पाटीलची क्षेत्रभेट


मी निर्माण ५ चा सागर पाटील. काही दिवसापूर्वी झालेल्या धुळे दंगलीच्या संदर्भात मला धुळ्याला Action-Aid NGO तर्फे दंगलीसंदर्भात चर्चा व आढावा घेण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. प्रा. शेखर सोनाळकर (सर), जतीन देसाई, Action-Aid  NGO चे कार्यकर्ते, प्रतीक्षा जंगम, निर्माणचा संदीप देवरे व मी धुळ्याला गेलो होतो. आम्ही जळगाव वरून निघतानाच सरांनी ट्रेनिंग सुरु केलं. सर म्हणाले, “दंगलीचा अभ्यास करताना पहिल्याक्षणी अस जाणवत की कारण हे धर्म असेल, पण ते बहुतेक वेळा नसतं. यासंदर्भात मागच्या दंगलीचा आढावा घेतला जाऊ शकतो. आढावा घेताना आपण पहिले आपण समस्या समजून घ्यायला जात असतो त्यामुळे डोक्यात कुठलाही पूर्वग्रह नसावा.” सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दंगल झालेले दोन गट, दंगलीपासून दूर राहिलेले स्थानिक, जिल्हाधिकारी, एस.पी., स्थानिक पत्रकार व संपादक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भेटीचा लवकरच अहवाल बनणार असून त्यातील निरीक्षणांच्या आधारे दंगल प्रतिबंधक उपाय योजण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment