'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

प्रियदर्श तुरेच्या आकाशवाणीवर ‘दिलखुलास गप्पा’

डॉ. प्रियदर्श तुरे याच्या कामावर शैलजा तिवलेने लोकसत्ताच्या करीअर वृत्तांत या पुरवणीसाठी लिहिलेला लेख वाचून प्रियदर्शला आकाशवाणीवर ‘दिलखुलास गप्पा’ या मुलाखतीसाठी निमंत्रित केले गेले होते. ही मुलाखत ‘सूचना व जनसंपर्क’ मंत्रालयामार्फत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून १६, १८ व १९ मार्च रोजी प्रसारित केली गेली. मुलाखतीदरम्यान प्रियदर्शने अगदी बालपण, महाविद्यालयीन जीवन येथपासून त्याची प्रेरणास्थाने, बिहार पूरादरम्यानचे मदतकार्य, मेळघाट येथे  आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव, मेळघाटच्या आदिवासींच्या आरोग्याची स्थिती, त्याचे सध्याचे i2h चे काम व भविष्यातील योजना इ. विषयांवर त्याने मनमोकळेपणे संवाद साधला.

No comments:

Post a Comment