'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

सांगलीच्या निर्माणींची ‘गांधी तीर्थ’ला भेट

जळगाव मधिल जैनहिल्स येथील 'गांधी तीर्थ'ला सोनिका राठी (निर्माण ४), वृषाली पोतदार (निर्माण ५) आणि शीतल कवडे (निर्माण ४) या तिघींनी भेट दिली. गांधींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि गांधींच्या वस्तूंचे जतन व्हावे या उद्देशाने ' गांधी तीर्थ'ची स्थापना श्री. भंवरलालजी जैन यानी केली. २५ मार्च २०१२ ला तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन ज़ाले. गांधी तीर्थ येथे गांधी संग्रहालय, Gandhi International Research Institute, Gandhi archives publications आहेत. गांधी संग्रहालय हे दृक्‌श्राव्य प्रकारचे संग्रहालय असून चित्रे, फोटो, पुतळे, व्हीडीओ आणि रेकॉर्ड्स यांद्वारे गांधींचे पूर्ण जीवन आतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शित केले आहे. 
            तसेच गांधी तीर्थ हे Gandhian study and research साठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. येथे गांधींच्या विचारांवर आधारित ग्रामविकासाचे अनेक उपक्रम राबविले जातात. शेतीमधील देखील अनेक प्रयोग येथे केले जातात.
गांधी तीर्थ बद्दल अधिक माहितीसाठी: www.gandhifoundation.net

No comments:

Post a Comment