'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

प्रफुल्ल वडमारेचे सोशल ऑलिम्पियाड प्रकल्पांतर्गत काम सुरू

प्रफुल्ल वडमारे (निर्माण ५) मूळचा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातला. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर. प्रफुल्लने नुकतेच सोशल ऑलिम्पियाड प्रकल्पामध्ये जुनियर अॅकॅडेमिक फेलो म्हणून कार्यभाग स्वीकारला. ह्या प्रकल्पांतर्गत प्रसिद्धी करणे, विविध मेण्टोर्सशी जोडून घेणे, मुलांसाठी वेगवेगळे कृती कार्यक्रम आखणे तसेच त्यांचा पाठपुरावा करून त्यांचे मूल्यमापन करणे ही सर्व कामे प्रफुल्ल करणार आहे. ह्यासाठी त्याला एम.के.सी.एल. मधील श्री. नरेंद्र खोत ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सोशल ऑलिम्पियाड हा प्रकल्प लवकरच लॉंच होणार असून त्याचा पथदर्शी प्रयोग पुणे जिल्ह्यातील काही भागात करण्याचे ठरले आहे. प्रफुल्लला त्याच्या कामासाठी शुभेच्छा !

No comments:

Post a Comment