'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

वर्धा शोधयात्रेत मंदार देशपांडेचा सहभाग

 प्रा. अनिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ वी शोधयात्रा ६-१२ मे दरम्यान वर्धा जिल्ह्यात आयोजित करण्यात आली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी मंदार देशपांडे (निर्माण ४) आणि निर्माण वर्धा समूहातील गोपाल गावंडे यात्रेत सहभागी झाले. त्या दिवशी ढगा गावापासून निघालेली यात्रा भिवापूर, हेटी, नांदोरा, कनामवार, अंजनडोह व हेटीकुंडी इ. गावांतून पुढे गेली.
स्थानिक लोक कसे राहतात हे समजून घेणे, त्यांची प्रयोगशीलता- त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान समजून घेणे, त्याचे संकलन करणे, आपल्या कडील ज्ञान त्यांच्या पर्यंत पोहचवणे असा यात्रेचा उद्देश होता.
 लोकांकडे पारंपारिक ज्ञान आहे, पण त्यांचा स्वतःवर कमी व शिकलेल्या लोकांवर-शास्त्रज्ञांवर जास्त विश्वास आहे. खरे तर त्यांच्या ज्ञानाला, कौशल्याला विश्वास देण्याची गरज आहे. त्यातून काम आणि संशोधन यांची  सांगड चांगल्या प्रकारे घालता येईल.असे निरीक्षण मंदारने नोंदवले.
 यात्रेमध्ये स्वतः प्रा. अनिल गुप्ता, 3 idiots फिल्ममध्ये शेवटी करीना ज्या स्कूटरवर बसून येते ती तयार करणारे शेख जहांगीर, तीन चाकी सायकल रिक्षाच्या रचनेत बदल करून श्रम कमी करणारे नागपूरचे ७५ वर्षीय रिक्षा चालक, तसेच SRISTI, GIAN, NIF या ठिकाणी काम करणारे अनेकजण सहभागी झाले होते.शोधयात्रेबद्दल अधिक माहितीसाठी:  http://www.sristi.org/cms/shodh_yatra1

No comments:

Post a Comment