'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

पुणे गटाची जामखेड येथील Comprehensive Rural Health Project ला भेट

             निर्माणमध्ये दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या क्षेत्रात कार्यानुभव घेण्याच्या विविध संधी शोधण्याच्या निमित्ताने पुणे गटाच्या काही तरुणांनी नुकतीच जामखेड (अहमदनगर) येथील डॉ. राज आणि डॉ. मेबल आरोळे यांनी स्थापन केलेल्या Comprehensive Rural Health Project (CRHP) ला भेट दिली. या गटात चारुता गोखले (निर्माण १), सायली ताम्हणे (निर्माण १), गौरी चौधरी (निर्माण ४) आणि अर्चना फडणीस यांचा समावेश होता. या संस्थेची स्थापना १९७०मध्ये झाली असून ग्रामीण भागात आरोग्य सेविकांचे जाळे तयार करून आरोग्यसेवा देणे हे मॉडेल सर्वप्रथम येथे विकसित झाले आणि भारतभर पसरले. या संस्थेअंतर्गत हॉस्पिटल, आरोग्यासेविकांद्वारा गावांमध्ये आरोग्यसेवा, महिलांचे बचत गट आणि त्याद्वारे ग्रामविकास कार्यक्रम, कुमारवयीन मुलामुलींचे संवाद गट, शेतीचे प्रयोग, पाणी नियोजन असे अनेक कार्यक्रम राबवले जातात. तसेच येथे अपंगांसाठी बनवण्यात येणारे जयपूर फूट तयार करण्याचाही कारखाना आहे. संस्थाभेटीदरम्यान गटाची कामाबरोबरच संस्थेचे सध्याचे व्यवस्थापकीय अधिकारी रवी आरोळे यांच्याशी भेट झाली. भेटीदरम्यान संस्थेच्या गरजा आणि आगामी उपक्रम याबद्दल चर्चा झाली. तसेच निर्माणचे तरुण संस्थेच्या कामात कशाप्रकारे सामील होऊ शकतात याविषयीही चर्चा झाली. वर्षातून दोनदा संस्थेमध्ये शस्त्रक्रिया शिबिरे भरतात. त्यात फ़िजिओथेरपीची गरज असणारेही रुग्ण असतात. ग्रामीण भागात फ़िजिओथेरपीची उपयोगिता सिद्ध करण्याची इच्छा असणाऱ्या गौरीसाठी ही चांगली संधी असून पुढील शिबिरामध्ये सहभागी होण्याची तिने इच्छा व्यक्त केली आहे.  

CRHP बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.jamkhed.org/  

No comments:

Post a comment