'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

गोपाल महाजन आणि अजय होले यांचा प्रगती अभियान व पाणी पंचायत सोबत एकत्र प्रवास सुरू

ग्रामीण रोजगार आणि प्रशासन या क्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीने गोपाल महाजनने (निर्माण १) ‘प्रगती अभियान’सोबत आपला प्रवास पुन्हा सुरू केला आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी कशी आहे? ग्रामपंचायत आणि ब्लॉक पातळीवरील सर्वोत्तम कार्यपद्धती कोणत्या? रोजगार हमीद्वारे ग्रामपंचायतींचे किती सक्षमीकरण होते? वितरण प्रणालीमध्ये सुधारणा कशा करता येतील? रोजगार हमीचे खाते आधार कार्डासोबत जोडण्याचा झारखंडमध्ये जो प्रयोग होत आहे त्यामुळे मजुरीच्या वितरणावर सकारात्मक परिणाम होतो का? इ. प्रश्नांवर ११ राज्यांमधील ७२ संस्था मिळून बनलेले National Consortium of Civil Society Organizations on NREGA संशोधन करणार असून यात गोपाल प्रगती अभियानमार्फत Research Assistant म्हणून काम करेल.
याशिवाय धुळे जिल्ह्यातील साधारणपणे ५५० ग्रामपंचायतींसोबत रोजगार हमी योजनेच्या social audit च्या येऊ घातलेल्या प्रकल्पात गोपाल प्रगती अभियानतर्फे सहभागी होणार आहे. Social audit चे नियोजन, पथदर्शी प्रयोग व मंत्रालयातील आढावा बैठकी इ. प्रक्रियांसोबत गोपाल एक वर्षभर जोडलेला असून त्याला या अनुभवाचा धुळ्यात नक्कीच फायदा होईल.
गोपाल सोबतच अजय होले (निर्माण ४) यानेही प्रगती अभियान सोबत काम सुरू केले आहे. ४०-५० गावांच्या कार्यक्षेत्रातील ५-६ गावे निवडून तेथे पाणलोटाचे नियोजन करणे, रोजगार हमी योजनेतून ही कामे केली तर त्याचा होणारा परिणाम तपासणे ही अजयची प्रमुख जबाबदारी असणार असून धुळे जिल्ह्याच्या social audit मध्येही त्याचा सहभाग असेल.
याबरोबरच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तुलुक्यातल्या पंचक्रोशीत (पाच गावांत) पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी अर्थसहाय्य व संशोधनाचे प्रस्ताव लिहिण्यासाठी गोपाल आणि अजय पाणी-पंचायत सोबत काम करणार आहेत. दोघांनाही त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
प्रगती अभियानबद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/
पाणी-पंचायतबद्दल अधिक माहितीसाठी: http://panipanchayat.org/

स्त्रोत- गोपाल महाजन, mahagopsu@gmail.com
अजय होले, ajayhole1@gmail.com

No comments:

Post a Comment