'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

अश्विनी येर्लेकरची नागपूरच्या ‘मैत्री’ संस्थेला भेट

नागपूरमधील मैत्रीसंस्था व्यसनमुक्ती व पुनर्वसनाचे काम गेली काही वर्षे करीत आहे. श्री. रवी पाध्ये ह्यांनी सुरु केलेली ही संस्था त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील व्यसनमुक्तीने प्रेरित होऊन आकाराला आली आहे. संस्थेतील कामाची पद्धत, विचार, उपचार इत्यादी सर्व गोष्टी ह्या पुण्यातील मुक्तांगण संस्थेसाराखेच आहेत. श्री. पाध्ये हे मुक्तांगण मध्ये उपचार घेत असल्यापासून त्यांची आणि मुक्तांगणची नाळ जुळली आहे.       
            अश्विनी येर्लेकरने (निर्माण ५) मागील महिन्यात मैत्री संस्थेला भेट देली. व्यसनमुक्तीच्या विषयावर काम करण्याचा अश्विनीचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी पाहा - http://www.maitreedc.org/
स्रोत अश्विनी येर्लेकर ashwini.yerlekar@gmail.com

No comments:

Post a Comment