'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

सायली वाळकेचे MLD trust मार्फत ठाणे जिल्हयातील आदिवासींसोबत काम सुरू

        ठाणे जिल्ह्यातील विक्रमगढ व पालघर तालुक्यात आरोग्य, तसेच सेंद्रीय शेती व रोजगार इ. मार्फत आदिवासींच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या MLD Trust सोबत सायली वाळकेने (निर्माण ५) काम सुरू केले आहे. Advertizing मध्ये पदवीचे आणि Strategy design मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सायली संस्थेच्या बाह्यसंपर्काची (लाभार्थी, देणगीदार व इतर संस्थांसोबत) जबाबदारी सांभाळणार आहे. यासोबतच ती कातकरी व वारली आदिवासींच्या बचतगटांचे काम शाश्वत कसे बनवता येईल, बाह्यसाधनांवर अवलंबून न राहता त्यांच्या रोजगाराच्या संधी कशा निर्माण होऊ शकतील इ. प्रश्नांवरदेखील काम करणार आहे.  MLD Trust सोबत निर्माणचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुनील चव्हाण आधीच संलग्न असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा सायलीला नक्कीच फायदा होईल. आदिवासींसोबत काम करता करता आपले शिक्षण व विकास व्हावा यासाठी सायलीला शुभेच्छा !
MLD Trust बद्दल अधिक माहितीसाठी: http://mldtrust.org/home.aspx  

स्त्रोत- सायली वाळके, walkesayli1986@gmail.com

2 comments: