'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

मयूर सरोदेचा SELCO Foundation च्या शिबिरात सहभाग

सौर उर्जा या क्षेत्रात उद्योजक म्हणून काम करणाऱ्या मयूर सरोदेने (निर्माण ४) २५ ते २९ जुलै दरम्यान कोलकत्यामध्ये SELCO Foundation तर्फे आयोजित शिबीरामध्ये भाग घेतला. डॉ. हरीश हंडे यांनी सुरु केलेली SELCO India सौर ऊर्जेद्वारे ग्रामीण विद्युतीकरणाच्या क्षेत्रात १८ वर्षे काम करत आहे. आपण विकसित केलेली पद्धती इतरांना शिकवण्यासाठी त्यांनी SELCO Foundation ची स्थापना केली. त्यामार्फत ते या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नव्या उद्योजकांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते.
दोन महिन्यांतील मयूरच्या कामाचे मूल्यांकन करून या संस्थेने त्याची या शिबिरासाठी निवड केली होती. या शिबिरामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी सुयोग्य सौर उर्जा प्रणालीबद्दल माहिती आणि ही प्रणाली कशी उभारावी (Installation) याबद्दल प्रात्यक्षिक होते. याअंतर्गत शिबिरार्थ्यांनी दोन दिवस दोन वेगवेगळया ठिकाणी On Site Installation केले गेले. शेवटच्या दिवशी शिबिरार्थ्यांना कोलकात्यामध्ये SELCO Foundation चे मार्गदर्शन व मदत घेऊन मागील वर्षी काम सुरू केलेल्या उद्योजकाला भेटण्याची व त्याचे काम पाहण्याची संधी मिळाली.  
            नाशिकजवळच्या मुळेगावचे काही प्रमाणात सौर-विद्युतीकरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयूरला या शिबिराचा उपयोग होईल. त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

स्त्रोत- मयुर सरोदे, mayursarode17@gmail.com

1 comment: