'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

ग्रामीण रुग्णांना शस्त्रक्रिया परवडणार कशा? भूपेंद्र कोसरेचा शोध सुरू

ग्रामीण भागातील रुग्ण गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी शहरात जातो, तेंव्हा उपचार/शस्त्रक्रिया या खर्चांसोबतच प्रवास, राहणे, जेवण, औषधे या सर्वांचे खूप मोठे ओझे त्याच्यावर येऊन पडते. या ओझ्याखाली दबून जाण्यापेक्षा बऱ्याचदा तो आजाराकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतो. आरोग्यसेवेतील या अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व ग्रामीण रुग्णांना अत्यल्प खर्चात उपचार / शस्त्रक्रिया शक्य व्हाव्यात या  हेतूने भूपेंद्र कोसरे (निर्माण ५) सर्चमध्ये रुजू झाला आहे.
केशरी, पिवळे शिधापत्रधारक आणि अंत्योदय, अन्नपूर्णा पत्राधारक यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता शासन भरत असून लाभार्थींच्या कुटुंबांना तपासणी, निदान, उपचार, औषधे, शस्त्रक्रिया, प्रवासखर्च, भोजन, उपचारांचा पाठपुरावा, गुंतागुंतीचे उपचार याकरिता १.५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण लाभणार आहे. सर्चजवळील १७ गावांमधील लोक, या भागातील रुग्णालये, विमा कंपनी यांच्यामार्फत भूपेंद्र या योजनेतील बारकाव्यांचा व अडचणींचा अभ्यास करत आहे. सर्च रुग्णालयात दरवर्षी साधारणपणे १२०० रुग्ण भरती होतात व ४५० रुग्णांवर शस्त्रक्रिया होते. या रुग्णांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यावर भूपेंद्र काम करत आहे.
याखेरीज डॉ. शेखर भोजराज व सहकारी Spine Foundation मार्फत सर्च रुग्णालयात गेली अनेक वर्षे पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करीत आहेत. बाहेर दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया गडचिरोलीच्या ग्रामीण रुग्णांसाठी अत्यल्प खर्चात होतात. ही सुविधा जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत कशी पोहोचवता येईल यावरदेखील भूपेंद्र काम करत आहे.

स्त्रोत- भूपेंद्र कोसरे, bkosare@yahoo.co.in  

No comments:

Post a Comment