'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

सेंद्रीय शेती अभ्यास गटाचा महाराष्ट्र व आंध्रप्रदेश दौरा

सेंद्रीय शेती अभ्यास गट हा महाराष्ट्रभरातील सेंद्रीय शेती करणाऱ्या किंवा करण्यात रस असणाऱ्या व्यक्तींचा गट आहे. दोन महिन्यातून एकदा भेटून शेतीतील नवनवीन संकल्पनांवर चर्चा करणे, स्थानिक वाणाची देवाणघेवाण करणेस्वत:ला पडणारे प्रश्न मांडून त्यावर चर्चा करणे, स्वत:चे अनुभव शेअर करणे असे ह्या गटाचे काम चालते. ह्यामध्ये संजय पाटील व हर्षल शेवाळे (निर्माण ३) ह्यांचादेखील समावेश आहे. 

ह्या गटाने नुकतेच महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, यवतमाळ व आंध्रप्रदेशातील मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी एक अभ्यास दौरा केला. ह्यामध्ये सदाभाऊ शेळके (मनमाड - हे सेंद्रीय शेतीच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत, तसेच पाण्याच्या संवर्धनाबद्दलदेखील प्रयत्नशील आहेत), उद्धव मोरे ( कोपरगाव सांगावी - हे स्वत: संशोधक असून कांदा पेरण्याचे एक अंधुक यंत्र त्यांनी शोधले आहे व त्याचे पेटंट देखील त्यांना मिळाले आहे. तसेच पाण्यातील क्षार कमी करण्याचे देखील तंत्र त्यांनी शोधले आहे.), जितुभाई कुटुमुटी ( मनमाड - नैसर्गिक शेती), आनाद्राव सुभेदार (यवतमाळ), पद्माकर चिंचोळे (सेंद्रीय गुळ निर्मिती) इत्यादी अनेक शेतकऱ्यांना ह्यावेळी भेट देण्यात आली. ह्यात विशेष म्हणजे रवींद्र शर्मा नावाचे शेतकरी अदिलाबाद येथे जुन्या ग्रामव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बारा बलुतेदार पद्धतीतील सर्व कला आपल्या कलाश्रामात शिकवीत आहेत. 

हर्षल मूळचा इंजिनिअर असून सध्या PTC ह्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. मात्र पाचवड येथील आपल्या गावी असणाऱ्या शेतीमध्ये तो नियमित प्रयोग करीत असतो. तेथील शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रीय शेतीबद्दल चर्चा करणे, डोंगराळ भागातील सेंद्रीय शेतकरी ओळखून त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे व स्थानिक वाणाचे संवर्धन करणे ह्यात त्याला विशेष रस आहे. सेंद्रीय शेतीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'bookmyshow' च्या धर्तीवर एक वेबसाईट बनवण्यावर तो काम करत आहे. त्याला त्याच्या कार्यासाठी शुभेच्छा !   
वरील शेतकऱ्यांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्याला नक्की संपर्क करा. 


स्रोत - हर्षल शेवाळे, 01harshal.shewale@gmail.com

No comments:

Post a Comment