'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

“आकाशवाणीच्या नाशिक केंद्रात आपले स्वागत आहे !”

आजही रेडिओ हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं खूप महत्त्वाचं माध्यम आहे. मुक्ता नावरेकरने (निर्माण ३) यापूर्वी रेडिओवर काही कार्यक्रम केले असल्यामुळे युवांचे कार्यक्रम, पर्यावरण, मानसिक आरोग्य इत्यादी विषयांवर आकाशवाणीत काही काम करावं अशी तिची इच्छा होती. मात्र रेडिओच्या कामाचं शास्त्रीय प्रशिक्षण आणि ज्ञान तिला नव्हतं. दरम्यान आकाशवाणीची Casual Announcers च्या panel साठी परीक्षा आणि ऑडिशन होती. त्यात तिची निवड झाली. त्यानंतर 'वाणी' (Voice Articulation and Nurturing Initiative) हा All India Radio चा कोर्स झाला. सध्या आठवड्यातून २-३ दिवस मुक्ता आकाशवाणीत जाते व काही लहान कार्यक्रम, एडिटिंग, बाहेर जाऊन रेकोर्डिंग अशा गोष्टी करते.
आपल्या नव्या कामाबाबत बोलताना मुक्ता म्हणाली, “आकाशवाणीत नवीन तरुणांचा सहभाग असावा असा आकाशवाणी नाशिकचा प्रयत्न आहे. प्रशिक्षणाच्या काळात आम्ही आकाश बडवे, वैभव आगवणे, राजसी कुलकर्णी, शीतल महाजन यांच्या मुलाखती घेतल्या. आकाशवाणी नाशिकचे कार्यक्रम अधिकारी शैलेश माळोदे हे खूप उत्साही आणि नवीन कल्पनांना नेहमी प्रोत्साहन देणारे आहेत. सर्व उद्घोषकांच्या टीमसोबत रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि कामात मजाही येते

स्त्रोत – मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

No comments:

Post a comment