'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

पवन पाटीलचे Community Empowerment Lab (CEL) बरोबर काम सुरु

पवन पाटील (निर्माण १) मूळचा BAMS डॉक्टर असून त्याने अमेरिकेतील University Of North Texas येथून Masters In Public Health केले आहे. मागील ३ महिन्यांपासून तो Community Empowerment Lab (CEL) Lucknow येथे Public Health Research Scientist या पदावर कार्यरत आहे. याआधी पवनने Johns Hopkins विद्यापीठाच्या Center for Communication Programs या संस्थेसोबत भारतात २००९ मध्ये आलेल्या ‘स्वाईन फ्लू’च्या साथीचा अभ्यास करून भविष्यात अशाप्रकारच्या साथींना त्वरीत अटकाव घालण्यासाठीच्या उपायांसंबंधी संशोधन केले.
      
CEL ही संस्था श्री. विश्वजीत कुमार ह्यांनी सुरु केली असून रायबरेली जिल्ह्यामधील ग्रामीण भागात, लोकांमध्ये culturally relevant interventions च्या माध्यमातून आरोग्य सुधरवणारे वर्तणुकीतील बदल घडवून आणणे असे ह्या संस्थेचे ध्येय आहे. श्री. विश्वजीत कुमार हे स्वत: MBBS असून त्यांनी नंतर अमेरिकेतील Johns Hopkins विद्यापिठातून Masters in Public Health केले आहे. संस्थेचे काम ४ पातळ्यांवर चालते.
१.      लोकांची संस्कृती व विचारसरणी समजून घेऊन त्यांना अनुरूप अशी छोटी छोटी पण वैज्ञानिक माहिती पुरवणे.
२.      त्या माहितीचा उपयोग रोजच्या आयुष्यात करण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांना देणे.
३.      हे बदल सतत करत राहण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे (कुठल्याही प्रलोभानांशिवाय)
४.      हे बदल सातत्याने जीवनाचा भाग होत राहण्यासाठी तसे वातावरण / अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. 

CEL संस्थेच्या प्रयत्नातून, त्यांनी हा प्रकल्प राबविलेल्या गावांमध्ये नवजात मृत्यूदर (चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू दर) ५४% कमी झालेलली आढळून आले. त्यांचे हे संशोधन Lancet मध्ये प्रकाशित झाले असून त्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे बघा -http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS014067360861483X/abstract

कुठल्याही एका माणसामार्फ़त गावाच्या आरोग्यसुधारणांऐवजी लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, जीवनशैली ह्यामध्ये बदल घडवून आणून संपूर्ण गाव सक्षम करणे व त्यामार्फत आरोग्याचा दर्जा सुधारणे असा CELचा प्रयत्न आहे. सध्या पवन CEL मध्ये Research आणि Intervention Design या दोन टीम्ससोबत काम करतोय. पवन CEL चा हाच BCM रिसर्च उत्तर प्रदेशच्या बचत गटांच्या माध्यमातून पसरविण्याच्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. हा प्रकल्प Public Health Foundation of India, Bill and Melinda Gates foundation, Boston University व राजीव गांधी महिला विकास परियोजना ह्यांच्या संयुक्त विद्यमाने घडतो आहे.

पवनला त्याच्या नवीन कामासाठी खूप खूप शुभेच्छा ! 

CEL च्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी हा TED talk बघा: http://www.youtube.com/watch?v=49uFWJCCPqI


स्रोत - पवन पाटील, pawangpatil@gmail.com   

No comments:

Post a Comment