'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

सुवर्णा खडक्कारचे महाराष्ट्रात पडणाऱ्या कीडीवरील संशोधन प्रसिद्ध

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीडविज्ञान शाखेत संशोधन करणारी सुवर्णा खडक्कार आपल्या संशोधनाबद्दल सांगतेय...
“हुमणी ही होलोट्रिकिया या प्रजातीची अळी अवस्था असून ती उस, कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर जगते. ही कीड पिकांची मुळे खाते. त्यामुळे ते झाड व अंतिमतः पूर्ण शेतच ओसाड पडते. महाराष्ट्रात कोल्हापूर, धुळे, अमरावती, अकोला, गडचिरोली, नागपूर भागात २०१२-१३ मध्ये या कीडीचा प्रादुर्भाव खूप आहे ही माहिती मिळाल्यावर आमच्या प्रोजेक्ट टीमने महाराष्ट्रातील एकूण ९ कृषी हवामान दृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी (agro climatic zones) ५ क्षेत्रांमध्ये संशोधन केले व तेथून या कीडीच्या वेगवेगळया अवस्था गोळा केल्या व पुढे त्यांचे संगोपन केले. या कीडींचे जैववर्गीकरण केल्यावर असे आढळले की होलोट्रिकिया जातीच्या ५ प्रजाती संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात. या संशोधनावर माझा पहिला शोधनिबंध ‘OCCURRENCE OF FIVE HOLOTRICHIA SPECIES (COLEOPTERA: SCARABAEIDAE: MELOLONTHINAE) IN MAHARASHTRA AND THEIR MALE GENITALIA CHARACTERIZATION’ या शीर्षकाने The Bioscan या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. दुसरा शोधनिबंध ‘OCCURRENCE OF HOLOTRICHIA SERRATA (SCARABAEIDAE: MELOLONTHINAE) IN VIDARBHA’ या शीर्षकाने Indian Journal of Entomology मध्ये प्रसिद्ध झाला.
Phadka grasshopper” नावाचा कीटक हा ज्वारी, गहू, चाऱ्याचे गवत व तांदूळ या पिकांवर जगतो. हा कीटक या पिकांची पाने खातो. या कीडीच्या नियंत्रणाकरिता आमच्या टीमने काही प्रात्यक्षिके केली. त्यांच्या निष्कर्षावर तिसरा पेपर ‘HOST PREFERENCE AND ITS EFFECT ON PHADKA GRASSHOPPER HIEROGLYPHUSNIGROREPLETUS  BOLIVAR’ या शीर्षकाने Indian Journal of Entomology मध्ये प्रसिद्ध झाला.
            आता माझे पुढचे काम अकोला जिल्ह्यातील मुख्य पिकांवर येणाऱ्या कीडीवर सुरू आहे.”

स्त्रोत : सुवर्णा खडक्कार, suvarnask17@gmail.com

No comments:

Post a Comment