'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

खानदेश गटाची आढावा बैठक संपन्न

खानदेश गटाच्या गेल्या काही महिन्यांपासून आढावा बैठकी सुरू आहेत. जानेवारीत झालेल्या बैठकीचा हा आढावा...
जळगावमध्ये झालेल्या बैठकीत सुनील काका, मयुर सरोदे, शाम पाटील, हर्शल काकडे, अद्वैत दंडवते, प्रणाली, निखिल मुळ्ये, भूषण देव व सागर पाटील उपस्थित होते. या बैठकीत मागील दोन महिन्यांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
याचदरम्यान जळगाव शहरातील विचारवंत वासंती दिघे व प्रा. शेखर सोनाळकर यांनी मुलांशी संवाद साधला. सुरवातीला ताईंनी छात्रभारती, जनसंघर्ष वाहिनी, जळगाव शहरातील व त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील महिला चळवळ, जळगाव शहरातील गाजलेले सेक्स कांड आणि त्याविरुद्ध लढा याविषयी संवाद साधला. त्यानंतर सोनाळकर सरांनी आणीबाणी, जेपींचे आंदोलन व बाबरी मशीद प्रकरण समजावून सांगितलं. १९७७ मध्ये झालेल्या आणीबाणीच्या आंदोलनात सरांनी १९ महिने तुरुंगात काढले होते. या चर्चेतून ‘व्यक्ती मोठ्या झाल्या तर चळवळी छोट्या होतात’ हे लक्षात आल्याचे सागर म्हणाला.
            पुढील कामाच्या नियोजनाच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र परिसरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या भेटी घेणे, ज्या ठिकाणी अशी बैठक असेल तेथील निर्माणीच्या कामाचं social audit करणे, एकमेकांच्या कामांमध्ये लागणाऱ्या संसाधंनाची मदत इ. मुद्दे समोर आले.

या बैठकीदरम्यान सर्वांनी मिळून Gandhi Research Foundation ला भेट दिली.

स्त्रोत- सागर पाटील, sgpatil4587@gmail.com

No comments:

Post a Comment