'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

बीरभूमची घटना घृणास्पद... पण आपण काय करणार?

पुण्यातील गटाचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न
प.बंगाल मधील जात पंचायतीच्या अनुमतीने झालेल्या बलात्काराच्या घटनेने अस्वस्थ होऊन पुण्यातील निर्माणच्या व इतर मित्र मैत्रिणींनी या विषयावर काम करायचं ठरविलं. या घृणास्पद घटनेनंतर एकत्र भेटून या गटाने उपलब्ध माहितीच्या आधारे सत्य शोधण्याचा व याबाबत एकमेकांची मते समजून घेण्याचा प्रयत्न केला. ‘आपल्याला काय करता येईल?’ यावर विचारमंथन करून सुरुवातीला त्यांनी या घटनेचा निषेध करणारं एक निवेदन तयार केलं आणि स्वाक्षरी मोहीम सुरु केली. नंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे निवेदन प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना, तसेच महिला व बाल कल्याण विभाग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पाठविण्याची व्यवस्था केली. 
या विषयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी लवकरच ते अंनिसच्या कार्यकर्त्यांचं एक सत्र आयोजित करणार आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा एखाद्या घटनेने फक्त अस्वस्थ न होता, आपला आवाज योग्य मार्गाने पोहोचविण्याची आणि अभ्यास करण्याची त्यांची ही पद्धत नक्कीच सकारात्मक आहे. या मंडळींचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

स्त्रोत – राही मुजुमदार, rahmujumdar@gmail.com

No comments:

Post a Comment