'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

खेळातून ‘विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन’

'खेळातून विज्ञान' शिबिरादरम्यानचा एक क्षण
भविष्यात येणारी पिढी ही विज्ञानाला किंवा तंत्रज्ञानाला बरोबर घेउनच येणारी आहे, हे जरी खरे असले तरी विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निर्माण मधील पंकज सरोदे, अश्विन पावडे, निकेश इंगळे  व त्यांचे काही मित्र याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून करत आहेत. ते ‘अनुबंध’ संस्थेमार्फत 'खेळातून विज्ञान कसे शिकावे आणि अनुभवावे' याचे एक दिवशीय शिबीर शाळा-शाळांमधून घेत आहेत.
दि.२७ - ३० डिसेंबर दरम्यान ‘सुराज्य सर्वांगीण विकास संकल्प’ या संस्थेमार्फत येरवडा (पुणे) परिसरातील झोपडपट्टीमधील मुला-मुलींसाठी शिबीर आयोजित केले गेले. पुण्याजवळ लोणीकंद येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, फुलगाव येथे हे शिबीर होते. या शिबिरात ‘अनुबंध’तर्फे ‘खेळातून विज्ञान’ उपक्रमाचा देखील सामावेश होता. या मध्ये टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाच्या संकल्पना शिकण्यावर अधिक भर होता. पंकज व सहकाऱ्यांनी मुलांना Pressure, Volume, Temperature, Magnetism, Light and Sound यांसारख्या संकल्पनांवर आधारित प्रयोग दाखवले. विद्यार्थ्यांनी स्वत: हे प्रयोग करून बघितले. या अनुभवाबद्दल बोलताना पंकज म्हणाला, “हे सर्व करत असताना मुलांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले. त्याच बरोबर त्यांचा प्रयोग स्वत: करण्याचा विश्वास देखील वाढला”.
पुढे भविष्यात "खेळातून विज्ञान" हा उपक्रम जास्तीत मुलांपर्यंत पोहचावण्यासाठी अनुबंधच्या संपूर्ण गटाला खूप खूप शुभेच्छा!!

स्त्रोत: पंकज सरोदे, sarodeps@gmail.com

No comments:

Post a Comment