'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

निर्माणीच्या नजरेतून
Demonetization: ८ नोव्हेंबर, २०१६ च्या रात्री पासून ते आतापर्यंत ह्या विषयावर भरपूर बोललं गेलंय. काळा पैसा, आर्थिक भरभराट, देशभक्ती, चलनचा तुटवडा, रांगेतील मृत्यू, वैगेरे, वैगेरे.
आर्वीला (जि. वर्धा) एका चहाच्या दुकानात लावलेली ही पाटी - सामान्य माणसात ह्या निर्णयाबद्दल असलेली भावना मिर्ज़ा ग़ालिब आणि सीमाब अकबराबादी यांच्या सुप्रसिद्ध शेरांचं विडंबन करून किती कल्पकपणे मांडलीये !

मूळ शेर
ज़हिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर,
या वो जगह बता जहाँ खुदा नहीं |
- मिर्ज़ा ग़ालिब

उम्र-ए-दराज़ माँग के लाई थी चार दिन
दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में |
- सीमाब अकबराबादी

स्त्रोत: मंदार देशपांडे, निर्माण


No comments:

Post a comment